Shani Vakri  saam tv
राशिभविष्य

Shani Budh Vakri: ५०० वर्षांनी शनी-बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Shani Dev And Budh Vakri 2025: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. याचसोबत वक्री आणि मार्गी देखील होतात. या दोन्ही ग्रहांच्या वक्री चालीने ३ राशींना लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Shani Dev And Budh Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतराने वक्री आणि मार्ग्रस्थ होतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. जुलै महिन्यात कर्म देणारा शनिदेव आणि व्यवसाय देणारा बुध वक्री चाल चालणार आहेत. या दोन्ही ग्रहांचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे.

यावेळी ३ राशी अशा आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. तसंच तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत.

मकर रास

शनि आणि बुध ग्रहाची वक्री हालचाल सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. शनिदेवाची वक्री गती करिअरच्या बाबतीत शुभ परिणाम देणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांचे त्यांच्या बॉस आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध असतील.

वृषभ रास

यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. परदेशातून नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामातून तुम्हाला पैसा मिळणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाचे वक्रदृष्टी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकणार आहे. या काळात तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

Bigg Boss 19 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस १९'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? ऑफिस वेळेनंतर नो कॉल-नो ईमेल

स्मृती-पलाशचं लग्न अखेर मोडलं, पुढे जाण्याची वेळ आली आहे

SCROLL FOR NEXT