Mangal Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Parivartan: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होणार शनीचं नक्षत्र परिवर्तन; 'या' राशींना मिळणार चांगल्या संधी

Dussehra astrology: दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या काळात होणारे ग्रह-नक्षत्रांचे बदल विशेष महत्त्वाचे मानले जातात. यंदा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनि ग्रह (Saturn) आपले नक्षत्र बदलणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या नशिबाची दारे उघडतील

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात शनिदेव यांना दंडाधिकारी ग्रह मानण्यात येतं. असं मानलं जातं की, शनिदेव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसारच फळ देतात. त्याचप्रमाणे शनि हा दुःख, वेदना, रोग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कारक ग्रह म्हणूनही ओळखला जातो. ज्यावेळी कधी शनीचा राशी बदल अथवा नक्षत्र बदल होतो त्यावेळी त्याचा परिणाम थेट सर्व राशींच्या जीवनावर उमटतो.

यंदाच्या वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी शनीचा नक्षत्र परिवर्तन होणार आहे. सध्या शनि उत्तराभाद्रपदा नक्षत्रात स्थित आहेत. मात्र या दिवशी ते गुरुच्या अधिपत्याखालील पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीला होणाऱ्या या बदलामुळे काही राशींना मोठा लाभ होणार आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचं हे नक्षत्र परिवर्तन अतिशय फायदे शीर ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात उन्नती मिळणार आहे. बराच काळ थांबलेला प्रमोशनचा प्रश्न सुटू शकतो. किंवा अडकलेले काम पुढे सरकू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. मोठ्या गुंतवणुकीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबतचे संबंध अधिक सुसंवादी होतील.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना शनीची ही स्थिती धनलाभ देणारी ठरेल. अचानक मिळणारा फायदा, स्थावर मालमत्तेतून लाभ किंवा पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. परदेशाशी संबंधित कामांमध्येही आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः स्पर्धा परीक्षांत यश मिळवून देणारा ठरेल.

कुंभ

कुंभ राशीसाठी शनीचं हे नक्षत्र परिवर्तन नवीन संधींची दारं उघडणारं ठरेल. थांबलेली कामं पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार असेल, तर हा योग्य काळ ठरेल. या काळात भाग्याची साथ मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Raj Thackeray : हे हिंदी हवं कशाला? स्टेशनच्या नावावरून राज ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं ?

नवी मुंबईतील विमानतळाचं उद्घाटन कधी होणार? नाव काय देण्यात येणार? मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Dharashiv Floods: घरात चिखल, मुलांची वह्या-पुस्तके पाण्यात, आईच्या अश्रूचा बांध फुटला, काळजाला धस्स करणारा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करणार- मंत्री गुलाबराव पाटील

Royal Enfield: Bullet झाली २० हजारांनी स्वस्त! 'या' APPवरुन घरपोच सुविधा

SCROLL FOR NEXT