Shukra Shani Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra Shani Yuti: दिवाळीपूर्वी शनी-शुक्र बनवणार दुर्मिळ संयोग; करियर आणि बिझनेसमध्ये होणार लाभ

Conjunction Of Saturn And Venus 2025: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात दिवाळी हा सण धन, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तापूर्वीच ग्रहांच्या स्थितीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ बदल घडत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव यांना न्यायाधीश आणि कर्मफल दाता मानलं जातं. तर शुक्र ग्रह धन, वैभव आणि ऐश्वर्य प्रदान करणारा ग्रह मानला जातो. सध्या शनिदेव मीन राशीत वक्री गतीने भ्रमण करतायत. दिवाळीपूर्वी शनि आणि शुक्र हे एकमेकांसमोर येणार असून दोघांची दृष्टिसुद्धा एकमेकांवर पडणार आहे.

या विशेष ग्रहस्थितीमुळे काही राशींचे नशीब उजळण्याची शक्यता आहे. या काळात काही राशींना धनलाभ, प्रगती आणि यशाचे योग तयार होणार आहेत. शनि–शुक्राची कृपा यावेळी कोणत्या राशींवर होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्र आणि शनि युतीचा मोठा फायदा होऊ शकतो. या काळात आकस्मिक धनलाभाचे अनेक प्रसंग येऊ शकतात. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन संधींचा योग्य फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी ठराल. अविवाहित व्यक्तींना मनपसंत व्यक्तीसोबत जवळीक वाढू शकते.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्र आणि शनिदेवांचा संयोग शुभ फळ देणारा ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना चांगल्या नफ्याचे योग दिसत आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. बचत वाढेल आणि संचयित संपत्ती मजबूत होणार आहे.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शनि–शुक्राची युती अत्यंत सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात व्यवसायात प्रगती होणार आहे. विरोधक शांत झाल्याने मानसिक शांती मिळणार आहे. समाजात नवी ओळख निर्माण होणार आहे. तुमच्या योजना यशस्वी होतील, धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलणार आहेत. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा लाभणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर हिंसाचार प्रकरण, ३९ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या KYC वर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, सरकारचा पैसा...

Child Dizziness: लहान मुलांना चक्कर आल्यास वेळीच करा हे ३ उपाय

Shani Vakri: 500 वर्षांनंतर दिवाळीला शनी चालणार वक्री चाल; नव्या नोकरीसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

कुठे ऊन तर, कुठे पावसाचा कमबॅक; कुठल्या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम? पाहा Weather Report

SCROLL FOR NEXT