Samsaptak Yog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: 30 वर्षांनंतर शनी-शुक्र बनवणार समसप्तक योग; 'या' राशींच्या आयुष्यात अचानक येणार सुखाते क्षण

Samsaptak Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात आणि एका ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी विशिष्ट संबंध आल्यास अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात. येत्या ३० वर्षांनंतर तयार झाला आहे, तो म्हणजे शनी-शुक्र समसप्तक योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह प्रेम, ऐश्वर्य, भौतिक सुख, विलास, सौंदर्य, संपत्ती आणि विवाह यांचा कारक मानला जातो. हा ग्रह कला, संगीत, मनोरंजन आणि फॅशनसारख्या क्षेत्रांशीही जोडलेला आहे. त्यामुळे शुक्राच्या स्थितीत होणारा बदल 12 राशींवर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रभाव टाकतो. सध्या शुक्र सिंह राशीत विराजमान आहे.

मात्र 9 ऑक्टोबर रोजी तो आपल्या नीच राशी कन्या मध्ये प्रवेश करणार आहे. नीच राशीत आल्यावर शुक्राचा सकारात्मक प्रभाव कमी होतो. मात्र या वेळी कन्या राशीत आधीच सूर्य ग्रह विराजमान आहे. त्यामुळे सूर्याशी युती करून शुक्रादित्य नीचभंग राजयोग निर्माण होणार आहे. या योगामुळे 12 राशींवर काही ना काही परिणाम दिसून येणार आहे. पण विशेषतः तीन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

ज्योतिषानुसार, शुक्राची कन्या राशीत प्रवेशाची माहिती

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:55 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या आधीच सूर्य विराजमान आहे. यामुळे नीचभंग राजयोग त्या वेळी तयार होतो जेव्हा एखादा शुभ ग्रह आपल्या नीच राशीत असलेल्या ग्रहाशी युती करतो. शुक्राच्या या युतीमुळे काही राशींना लाभ होऊ शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कन्या राशी (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लग्न भावात निर्माण होणारा नीचभंग राजयोग अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. या योगामुळे या राशीतील व्यक्तींना विविध क्षेत्रामध्ये असाधारण यश मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. नवी नोकरी शोधत असलेल्यांसाठीही अनुकूल संधी दिसणार आहे.

धनु रास (Sagittarius Zodiac)

धनु राशीमध्ये तयार होणारा नीचभंग राजयोग विविध क्षेत्रांत शुभ ठरणार आहे. हा योग कर्म भावावर, म्हणजेच दशम भावावर परिणाम करणार आहे. काम आणि व्यवसायात उल्लेखनीय प्रगती होण्याची संधी मिळणार आहे. नोकरशाहीत काम करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. आपल्या प्रतिभेची आणि रचनात्मकतेची प्रशंसा होणार आहे.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या आठव्या भावात तयार होणारा नीचभंग राजयोग अनेक चांगले परिणाम देणार आहे. या राशीतील व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या घरातील जुने वाद संपणार आहेत. आणि घरात सुख-शांती राहील. शुक्र ग्रहाच्या उपस्थितीमुळे भाग्य तुमच्या सोबत असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT