Saturday Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Saturday Horoscope: या 5 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

Saturday Horoscope: उद्या, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी एकादशी आणि द्वादशी तिथींचा संयोग असेल. मेष ते मीन अशा सर्व १२ राशींसाठीचे दैनिक भविष्य जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Saturday Horoscope: शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ हा दिवस सर्व १२ राशींच्या व्यक्तींसाठी नवीन संधी आणि अनुभव घेऊन येऊ शकतो. नक्षत्रांचा विचार करता, उद्या 'उत्तर भाद्रपदा' नक्षत्र असेल. चंद्र मेष राशीतून भ्रमण करत आहे. उद्या शनिवार असल्याने, शनिदेवाची उपासना करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते.

मेष

उद्याचा दिवस ठिक असेल. घाईत निर्णय घेण्याऐवजी संयम आणि विवेकाने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा आणि जोखमीच्या कामांपासून दूर राहा.

वृषभ

आर्थिक स्थितीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात शिस्त पाळा.

मिथुन

तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तुमची व्यवस्थापन कौशल्ये कार्यस्थळी फायदेशीर ठरू शकतात. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.

कर्क

उद्याचा दिवस आनंददायी असू शकतो. काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंब आणि आईकडून सहकार्य मिळेल, तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल.

सिंह

उद्याचा दिवस हा व्यवसायासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.कमाईची संधी चालून येण्याचा योग आहे. परिवारात मंगलकार्याची तयारी होण्याची शक्यता आहे.

कन्या

उद्याचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची चांगली संधी आहे. तुमच्या कामात आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

वृश्चिक

उद्या तुम्ही अधिक सक्रिय राहाल आणि करिअर तसेच व्यवसायात यश मिळवू शकेल. सहकारी आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. आपल्या योजनांबाबत आत्मविश्वास बाळगा.

धनु

भूतकाळात केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक फळ मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही कुटुंब आणि वैयक्तिक सुखा-सोयींकडे लक्ष देऊ शकता.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनिवारचा दिवस यश आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.

मकर

मकर राशीसाठी उद्याचा दिवस थोडा सावधानीचा राहिल. उद्या अधिक थकवा जाणवू शकतो. तसेच, उद्या वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा. घाई-घाईत कोणता निर्णय घेऊ नका.

कुंभ

वैयक्तिक आयुष्यात किंवा मानसिक स्थितीत काहीसा गोंधळ जाणवू शकतो. त्यामुळे संयमाने पुढे जा. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा आणि प्रगतीच्या संधींचा लाभ घ्या.

मीन

हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. खर्च वाढू शकतात आणि तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. व्यवसायात नफ्याचे संकेत असले, तरी कुटुंबातील सदस्यांच्या आणि पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमीन व्यवहारांवर आता आयकर विभागाची नजर! 2 लाखांवरील व्यवहारांची माहिती थेट सरकारला जाणार

Maharashtra News Live Update: वारकरी हा पंढरपूरचा व्हीआयपी आहेत त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे - एकनाथ शिंदे

Accident News : घरात एकटा कमावता, महिनाभरानंतर कामावर परतला अन् विपरीत घडलं; डिलिव्हरी बॉयचा करुण अंत

South Mumbai to Palghar: १००किमी लांबी,२ भुयारी मार्ग,५ इंटरचेंज; असा असणार मुंबईचा नवा 'कोस्टल रोड'

Sunday Mega Block: रविवारी बाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक बघा! 'या' मार्गांवर लोकलच्या फेऱ्या रद्द

SCROLL FOR NEXT