Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, मेषसह या ४ राशींच्या व्यक्तींची आज होणार भरभराट; इतरांकडून होईल वाहवा

Anjali Potdar

दैनिक पंचांग - मंगळवार १५ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्लपक्ष. भौम प्रदोष. तिथी-त्रयोदशी २४|२० रास-कुंभ नं. मीन. नक्षत्र-पूर्वाभाद्रपदा. योग-वृद्धि. करण-कौलव दिनविशेष-चांगला दिवस.

मेष - आज भौम प्रदोषचा दिवस आहे. आपल्या राशीला अशीही मंगळाची उपासना फलदायी आहे. अनेक लाभ वाट्यास येतील. विशेष गणेशाची उपासना करा.

वृषभ - दिवस चांगला आहे. काही ठराविक कामे लांबणीवर पडली असतील तर आज एकी हाती पूर्ण होतील. सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल टाकाल. कामात वृद्धी होईल.

मिथुन - नवीन काही गोष्टी खरेदी करायचे असतील किंवा मोठ्या प्रवासाची आखणी करायचे असेल तर आज दिवस चांगला आहे. खूप काही न ठरवता सहज गोष्टी घडतील, त्यामुळे याबद्दल देवाचे आभार माना.

कर्क - आपल्याच जवळचे लोक आपल्या पाठीत खंजीर खूपसतील. नको त्या गोष्टींचा ससेमीरा तुमच्या मागे लागेल. म्हणून वाईट गोष्टींपासून सावध राहण्याचा आज इशारा आहे

सिंह - संततीच्या पराक्रमावर आज खुश होऊन जाल. काही आनंदी गोष्टी कानी पडतील ज्यामुळे आपल्याला कृतकृत झाल्याची भावना येईल. व्यवसायामध्ये वृद्धीचे योग आहेत.

कन्या - नोकर चाकर वर्गाला सांभाळून घेतल्यास आजचा दिवस चांगला आहे. कामाला गती राहील. थोडा मनस्ताप असेल पण चोरावर मोर होऊन राहावे लागेल.

तूळ - मोठी गुंतवणूक किंवा शेअर मधील गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. पैसा आपल्या दिशेने वाटचाल करीतच आहे. पूर्वजन्मीचे सुकृत आज फळाला येईल. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - शेतीवाडीच्या गोष्टीस गती मिळेल. घरामध्ये किंवा शेतात विहीर करणे, बोअर यासाठी पुढाकार घ्याल. पुढे जा. याचे निर्णय आज पक्के होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल.

धनु - लेखणीतून प्रगतीचे आज योग आहेत. आपल्या वक्तृत्वाचा इतरांवर प्रभाव राहील. यश पदरी पडेल इतरांच्या कडून आपली वाहवा होईल. त्यामुळे मन फुलून जाईल.

मकर - घशाशी निगडित आजारापासून आज थोडा सावधगिरीचा इशारा आहे. थंड पदार्थ खाणे टाळा. आपल्या राशीच्या सवयीप्रमाणे पैशाच्या हिशोबात आज दिवस जाईल.

कुंभ - आपली ऊर्जा आज वाढती राहील. अनेक दिवस आलेले मळभ गळून जाईल. घेतलेले निर्णया प्रमाणेच वागाल. स्वतःसाठी आनंद शोधाल.

मीन - परदेश गमनाचे/ मोठ्या प्रवासाचे योग आहेत. किंवा याचे नियोजन आज पक्के कराल. पैशाला गळती आहेच. पण विनाकारण खर्च होत नाही ना याचा विचार करून तसा समन्वय साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपचा 'तो' प्रस्ताव CM शिंदेंनी धुडकावला? जागावाटपावरुन महायुतीत नेमकं काय घडतंय?

NTPC Job: NTPC मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी;'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सर्वकाही

Ankita Walawalkar: अंकिताने लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना दिली; कोकण हार्टेड गर्लने कारणही सांगितले, पाहा Video

Pigon Virus: 'कबूतर' व्हायरस घेईल जीव? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Health Tips : तासंतास डेस्क वर्कमुळे होऊ शकतो कंबरेचा गंभीर आजार; वाचा लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT