Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, मेष आणि सिंह राशीसाठी रविवार ठरणार लकी; तुमच्या नशिबात आज काय?

Anjali Potdar

आजचे पंचांग - रविवार १३ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्लपक्ष,पाशांकुशा (स्मार्त)एकादशी. तिथी-दशमी ०९|०९. रास-मकर १५|४४ नं. कुंभ. नक्षत्र-धनिष्ठा. योग-शूल. करण-गरज. दिनविशेष-२० प. चांगला

मेष - समाजामध्ये आणि कामाच्या ठिकाणी आपल्या माणसांना आणि प्रतिष्ठा वाढेल सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगतीचे आज योग आहेत. झोकून देऊन काम करा.

वृषभ - शासकीय कामाच्या दृष्टीने आज दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य मिळेल आणि कामे मार्गी लागतील. आज पाशांकुशा एकादशी आहे. विशेष विष्णू उपासना आपल्याला फलदायी ठरेल.

मिथुन - कधी कधी कोणाचे सहकार्याची अपेक्षा करायला नको असते. आजचा दिवस हा एकटेच चालण्याचा आहे. आपला अध्यात्माकडे सुद्धा कल राहील.

कर्क - महत्त्वाच्या गाठीभेटी आणि बैठका पार पडण्याचा आजचा दिवस आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. दिवसाच्या शेवटी सुयश हाती पडेल.

सिंह - आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. अचानक धनलाभाचे योग आहेत. काही जणांची शासकीय कामे मार्गी लागतील. अडचणी असल्या तरी सहकार्य लाभेल.

कन्या - आयुष्य हे आशावादावर टिकून असते. आज तुमच्या राशीला नवीन दिशा आणि नवे मार्ग मिळणार आहेत.ज्याचा शोध होता त्या गोष्टी सापडतील. मन आनंदी राहील. आज एकादशीचे विशेष व्रत आणि उपासना केल्यास इच्छित गोष्टी प्राप्त होतील.

तूळ - आज आपले मनोबल चांगले राहणार आहे. खंबीरपणे आयुष्यातील नवीन निर्णय घ्याल. कुटुंबीयांना बरोबर घेऊन जाल. प्रॉपर्टी चे नवीन प्रस्ताव असतील तर त्यात पुढे जायला हरकत नाही यश मिळेल.

वृश्चिक - ऐकावे जनाचे करावे मनाचे असा आज दिवस आहे. आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा. तुमच्याकडून आज होणाऱ्या गोष्टी अनेकांच्या आयुष्यासाठी मोलाच्या असतील. एक वेगळा संदेश लोकांपुढे ठेवाल .

धनु - आपल्या क्षेत्रात मोठे धाडस करायला हरकत नाही. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. खाण्यावर मात्र बंधन ठेवा.

मकर - तशी आपली रास बुजरी असली तरीही काही कामे आज धाडसाने पार पाडाल. पण तुमच्या राशीची खासियत आहेत असे तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. आयोजन नियोजन योग्य राहील.

कुंभ - व्यवसाय वाढीचा दिवस आज दिसतोय. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. दिवसाच्या शेवटी नवीन काही हाती आल्याचे समाधान असेल.

मीन - नोकरी व्यवसायात एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. ती पेलावीच लागेल. त्रास असला तरी त्यातून फायदा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : 'लाडकी बहिण योजना' एका पक्षाची नाही, आमदार अमित देशमुख

Baba Siddique Death News : मुंबई पोलीस सतर्क, सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

Baba Siddique Death: चार आरोपी, २ लाखांची सुपारी अन् पंजाब कनेक्शन, असा शिजला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; वाचा इनसाईड स्टोरी

Hair Colour : स्टायलीश लूकसाठी हेअर कलरचा विचार करताय? थांबा, आधी होणारे नुकसान वाचा

IND vs BAN: जलवा है हमारा.. जे रोहित, विराट अन् धोनीलाही नाही जमलं ते सूर्या भाऊने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT