Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश, मेष ते मीन राशीच्या नशिबात काय होणार बदल? वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग - शुक्रवार ११ ऑक्टोबर २०२४. अश्विन. शुक्लपक्ष, दुर्गाष्टमी महाष्टमी उपवास, नवमी उपवास. तिथी-अष्टमी १२|०७. रास-धनु ११|४१ नं. मकर. नक्षत्र-उत्तराषाढा. योग-सुकर्मा. करण-बवकरण. दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आपल्या राशीला भ्रमंतीची आवड आहे. आज मोठे प्रवास आपल्याकडून घडतील. मनासारख्या घटना घडण्याचा दिवस आहे. देवधर्मसाठी दूरच्या गावी जाण्याचे योग दिसत आहेत.

वृषभ - भ्रष्टाचार, लाचलुचपत या गोष्टींपासून सावध रहा. थोडक्या पैशाचा मोहासाठी वाईट गोष्टींमध्ये अडकण्याचे आज योग आहेत. सावधगिरीचा इशारा आहे.

मिथुन - जोडीदाराकडून आपण ज्या अपेक्षा केल्या आहेत त्या आज पूर्णत्वाकडे जाण्याचे योग आहेत. एकमेकांना सांभाळून घेऊन संसारातल्या अडचणीच्या गोष्टी आज पार पाडाल. कोर्टकचेरी मध्ये यश संभवते आहे.

कर्क - तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. त्यामुळेच कदाचित मनस्थिती बिघडण्याची आज शक्यता आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास बरे राहील. गुप्त शत्रूंचा त्रास होईल.

सिंह - हृदयाचे आणि पाठीच्या मणक्याचे विचार विकार आहेत त्यांनी थोडी आज काळजी घ्यावी. जास्त धावपळ आणि दगदग टाळावी. शेअर्स मध्ये यश मिळेल.

कन्या - जागेचे व्यवहार मार्गे लागतील सर्वांच्या सहकार्याने पुढे जाल. बौद्धिक गोष्टीमध्ये आघाडी मिळेल. सर्व प्रकारचे सुख लाभेल.

तूळ - आजचा दिवस पराक्रमाचा आहे. काही गोष्टी सहज आपल्याकडून चांगल्या दर्जाच्या होऊन जातील. इतरांवर आपला चांगला प्रभाव राहील. दिवस संमिश्र राहील.

वृश्चिक - धनाची आवकजावक चांगली राहील. काही मोठे निर्णय आज आपल्याकडून घेतले जातील. जे पुढील भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

धनु - आज आपला आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य असणार आहे. सकारात्मकता वाढून कामे सुरळीत होण्याचा आजचा दिवस आहे.

मकर - नियोजलेल्या कामामध्ये अडथळे येतील. कष्ट आणि मेहनत वाढीस लागतील. विनाकारण मनस्ताप वाट्यास येईल. काळजी घ्यावी.

कुंभ - बुद्धिवादी असणारी आपली रास आहे. काही गोष्टी ज्या फायद्याच्या समजून जुनी गुंतवणूक केली असेल त्याचा आज योग्य परतावा मिळताना दिसेल. दिवस उत्तम आहे.

मीन - करिअरच्या ठिकाणी आपली वाहवा होईल. वरिष्ठांचे सहकार्य तर कनिष्ठ व्यक्तींकडून आदर मिळेल. समाजकारण, राजकारणात यश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून गोपनीय सर्वेक्षण

Deepika Padukone : 'सिंगम अगेन'च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे दीपिका होतेय ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SSC Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमद्ये ३९४८१ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार; कारण...

Crime News: भयंकर! लॉजमध्ये तरुणीवर सपासप वार, नंतर प्रियकराने स्वतःला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील घटना

SCROLL FOR NEXT