Horoscope Today 30th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : सर्व गोष्टी मनासारख्या घडतील, अनेक लाभ पदरात पडतील; तुमच्या नशिबात आज काय, वाचा...

Today's Horoscope Marathi : राशीचक्रानुसार आज या व्यक्तींच्या मनासारख्या घटना घडतील. तसेच अनेक लाभ पदरात पडतील, वाचा राशीभविष्य....

Anjali Potdar

आजचे पंचांग ३० जुलै २०२४

वार - मंगळवार. आषाढ कृष्णपक्ष. तिथी-दशमी.नक्षत्र-कृत्तिका. योग - वृद्धि. करण -विष्टी. रास - वृषभ. दिनविशेष - चांगला दिवस

मेष : खच्चीकरण होऊन देऊ नका

आपले डोके जरी तापट असले तरी आज मानसिक खच्चीकरण होऊन देऊ नका. "घेतलेल्या आणि दिलेल्या पैशाचा हिशोब चोख ठेवा". खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : मनासारख्या गोष्टी घडणारा दिवस

"ध्यानी मनी म्हणे नसताना मनासारख्या गोष्टी घडणारा आजचा दिवस आहे." आपल्या राशीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी जसे कला, मनोरंजन, खरेदी पैशाची आवक चांगली राहिल. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल.

मिथुन : अनेक प्रश्न मार्गी लागतील

वडिलोपार्जित गोष्टींचे प्रश्न मार्गी लागतील. आज कुटुंबीयांशी चांगला संवाद साधा. त्याचा फायदा होईल. रुचकर जेवणाचा आनंद मिळेल.

कर्क : छोट्या सहलीचे आज योग

"छोटे प्रवास छोट्या सहलीचे आज योग आहेत." केलेल्या गोष्टी आणि ठरवलेली काम दोन्हीचा लाभ मिळणार आहे. एकूणच दिवस चांगला जाईल.

सिंह : मोठे व्यवहार मार्गी लागतील

"आपणच आपल्या तालावर नाचण्याचा आजचा दिवस आहे". कुणी कसेही वागले तरी नेटाने आपले काम करत जा. मोठे व्यवहार मार्गी लागतील. पैशाची निगडित आखणी होईल.

कन्या : विष्णू उपासना फलदायी ठरेल

उपासनेसाठी दिवस चांगला आहे. विष्णू उपासना फलदायी ठरेल. थोडा कर्मठपणा सोडून सहज आयुष्यात जगल्यास दिवस सुखाचा राहील.

तूळ : दुर्लक्ष करणे हेच योग्य ठरेल

काम, काम आणि काम असा आजचा दिवस आहे. बाहेरच्या खाण्यापासून आपल्या पोटाला जपा. गुप्त शत्रू त्रास देतील. पण दुर्लक्ष करणे हेच योग्य ठरेल.

वृश्चिक : दिवस सुखाचा आणि आनंदाचा

व्यवसाय आणि व्यापार याच्यामध्ये व्यवहारात वाढ होईल. दिवस सुखाचा आणि आनंदाचा असा आहे. मात्र मनाची चंचलता कमी केल्यास काही गोष्टी सुकर नक्कीच होतील.

धनु : वाईट गोष्टींमध्ये अडकण्याची शक्यता

शारीरिक श्रम जास्त होतील. थकवा जाणवेल. मनाने ठाम राहा. वाईट गोष्टींमध्ये अडकण्याचे आज योग आहेत. आपल्या राशीला ज्या सचोटीने गोष्टी करायला आवडतात तोच मार्ग बरा राहील.

मकर : सदगुरुंची कृपा राहील

तीर्थयात्रा होतील. आपल्या प्रवासाचे योग आजच्या दिवशी आहेत. धर्म आणि अध्यात्माची निगडित गोष्टी आपल्याकडून घडतील. सदगुरुंची कृपा राहील.

कुंभ : थोडी वणवण करायला लागेल

स्त्री सहकाऱ्यांचा आपल्या कामासाठी फायदा होईल. कामासाठी थोडी वणवण करायला लागेल पण आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींमुळे पुढच्या अनुभवांची शेजारी पक्की कराल.

मीन : अनेक लाभ पदरात पडतील

नातेवाईकांच्या योग्य सहकार्याने चार पावले पुढे जाल .आपले स्वतःचे मत थोडे बाजूला ठेवून चालल्यास अनेक लाभ पदरात पडतील. इतरांच्या मताला दुजोरा न देणे योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT