Daily Horoscope Today 7th August 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, मेषसह 'या' राशींच्या व्यक्तींना आज 'बाप्पा' पावणार, सर्व टेन्शन दूर होणार

Horoscope Today 7th September 2024 : आजचे राशीभविष्य, भाद्रपद शुक्लपक्ष. श्री गणेश चतुर्थी. पार्थिव गणेश पूजन. मेषसह 'या' राशींच्या व्यक्तींना आज 'बाप्पा' पावणार, सर्व टेन्शन दूर होणार

Anjali Potdar

आजचे पंचांग - शनिवार ७ सप्टेंबर २०२४. भाद्रपद शुक्लपक्ष. श्री गणेश चतुर्थी. पार्थिव गणेश पूजन. तिथी-चतुर्थी १७|३८ रास-तुला. नक्षत्र-चित्रा. योग-ब्रम्हा. करण-विष्टिकरण. दिनविशेष-आनंदी दिवस.

मेष - विनाकारण न केलेल्या गोष्टीचा ससेमिरा मागे लागतो. अशावेळी कोर्टात धाव घ्यावी लागते. या गोष्टी होत असतील तर आज तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे. तापटपणावर नियंत्रण ठेवा. गणेशाची उपासना विशेष फलदायी आहे. दिवस संमिश्र आहे.

वृषभ - कारण नसताना अपमान सहन करावे लागतील. इतरांचे आपण खूप काही केलेले असते पण त्यांच्या कडूनच अनादर पदरात पडेल. मनस्ताप टाळावा लागेल.

मिथुन - बोलण्यामध्ये आपली रास वाकबगार आहे. आज अनेक गोष्टी आणि अनेक संधी त्यामुळे उपलब्ध होतील. पैशाच्या निगडित व्यवहार पार पडतील. सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. गणपती यावेळी धनवर्षाव करेल.

कर्क - सुखाच्या संकल्पना या प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या असतात. आपल्या दृष्टीने इतरांना प्रेम देणे आणि त्यांनी आपलं कौतुक होणे यात सुख आहे. आज असाच दिवस जाईल. पाहुण्यांचे आगमन दिसते आहे.

सिंह - भावंडांवर विशेष प्रेम राहील. त्यांचे करण्यातच आपल्याला स्वार्थ वाटेल. आदर आणि पराक्रमाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कन्या - वक्तृत्वामध्ये काहीतरी कामे होण्याची आज शक्यता आहे. आपल्या बोलण्याने इतरांवर छाप पडेल. गोड बोलून इतरांची मने काबीज कराल.

तूळ - एका जागी स्थिर राहणे आपल्या राशीला जमत नाही. कामे काढून मुद्दाम भ्रमंती करत राहता. आज असाच दिवस आहे कामे वाढतील आणि त्यात आपल्याला आनंद मिळेल. आपले सल्ले इतरांना मार्गदर्शक ठरतील. गणेश उत्सव जोमाने साजरा कराल.

वृश्चिक - नवीन परिचय प्रस्थापित करताना चार वेळा विचार करा. सगळेच लोक विश्वासार्ह न. उगाचच आपल्याविषयी खोटे उठवणारे लोक आपल्या आजूबाजूला येतात आणि वाईट गोष्टीत अडकवतात. असे लोक आज टाळा.

धनु - सर्व गोष्टी मनासारख्या होतानाचा आजचा दिवस दिसत आहे. सुखाच्या संकल्पना आणि व्याख्या या विशेष भावतील. त्याकडे, जीवनाकडे सकारात्मकतेने बघाल. गणेशाच्या कृपेने विशेष लाभ होतील.

मकर - लहान व्यवसाय आणि उद्योग करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामासाठी प्रवासाचे योग आहेत. क्वालिटी वर्क ज्याला म्हणतात तसे काम आज आपल्या हातून होईल. कष्ट आणि मेहनत मात्र संपणारी नाही.

कुंभ - सद्गुरु भेटीचे योग आहेत. भक्ती भावाने मन भरून येईल. तीर्थक्षेत्री भेटी आणि अध्यात्मक प्रगतीचे योग दिसत आहेत. गणपतीची उपासना कामी येईल.

मीन - केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असा दिवस आहे. न थकता काम करावे लागेल आपल्या साधेपणामुले इतर लोकं फायदा घेत नाहीत ना याचा विचार करा. कष्ट, धावपळ, कटकटी वाढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT