Rashi Bhavishya Today 25 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : या राशीच्या लोकांवर आज पडणार यशाचा पाऊस; तुमची रास यात आहे का? वाचा आजचं राशी भविष्य

Horoscope Today 25 June 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार दररोज ग्रहमानात बदल होत असतात. याचा थेट परिणाम राशींवर होतो. तुमच्या नशिबात आज काय लिहलंय? वाचा राशी आजचं भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग, दिनांक २५ जून २०२४

वार - मंगळवार. तिथी -ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी. नक्षत्र - श्रवण. योग - वैधृती.करण - बव. रास - मकर २५.४९ नंतर कुंभ. अंगारक चतुर्थी. दिनविशेष - ९ नंतर चांगला.

मेष : यशाचा पाऊस पडेल

"परबतों सें काली घटां टकरां गई" असा आजचा दिवस आहे. म्हणजेच काय कामे वाढतील पण यशाचा पाऊस पडेल. त्यासाठी मात्र आपल्याला कष्ट आणि मेहनत जास्त घ्यावी लागेल.

वृषभ : भगवंताची कृपा असेल

"कानडा राजा पंढरीचा" असे आज वाटेल. आपण केलेल्या कामाचे सर्व श्रेय देवाला देऊन टाकलेले बरे असते. देव,धर्म, अध्यात्म आणि उपासना यात दिवस गेला तर पुढील कर्माचे संचित गोळा करता येते.

मिथुन : कष्ट करण्याचा दिवस

"आलिया भोगासी असावे सादर" असा दिवस आहे. कष्ट मेहनत करून हाताशी खूप काही लागेल असे वाटत नाही. म्हणून आहे ते मान्य करा आणि पुढे चला.

कर्क : काम यालाच सर्वस्व माना

"धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" असा दिवस आहे. काम यालाच आपण सर्वस्व मानणार आणि पुढे चालणार. व्यवसायामध्ये मोठी वाटचाल पादाक्रांत कराल.

सिंह : तक्रारीने हैराण व्हाल

थोडा तोळामासा दिवस आहे. तब्येतीच्या तक्रारीने हैराण व्हाल. म्हणून मन जरा दुसरीकडे वळवले तर बरे राहील. हाताखालचे लोक सुद्धा विनाकारण त्रास देतील.

कन्या : वेगळं करण्याची इच्छा होईल

आजचा दिवशी वेगळं काहीतरी करावं अशी इच्छा होईल. छोटसं नाटक तरी बघू. करमणुकीच्या कार्यक्रमाला जाऊ. मुलांबरोबर सुद्धा आनंदाने खेळून हसत खेळत दिवस जाईल.

तूळ : प्रेमाचे उमाळे येतील

आई विषयी विशेष प्रेम वाटेल अर्थात रोजच असते पण आज तिच्याविषयी प्रेमाचे उमाळे येतील. घरातल्यांबरोबर दिवस आनंदाने घालवाल. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .

वृश्चिक : काही सुवार्ता येतील

पत्रव्यवहार मार्गी लागतील. त्यातूनच काही सुवार्ता येतील. लेखन, प्रकाशानाशी निगडित कामे असतील तर त्यासाठी आजचा दिवस चांगल्या गोष्टी घेऊन आला आहे. उमेद वाढेल.

धनु : पैशांच्या देवाणघेवाणीचा दिवस

गुंतवणुकीसाठी, पैशांच्या देवाणघेवाणीसाठी दिवस चांगला राहणार आहे. त्याचा योग्य तो वापर करा. खाण्यापिण्याची लयलूट राहील .

मकर : व्यक्तिमत्त्व खुलून येईल

आपले व्यक्तिमत्त्व खुलून येईल. स्वतःसाठी विशेष काहीतरी करावे अशी भावना येईल. नवीन गोष्टी, कपडे खरेदी, अलंकार खरेदी या गोष्टी होऊ शकतात. एकूण सकारात्मक रहाल.

कुंभ : जे मिळेल त्यात सुख माना

बंधनात अडकणार नाही अशा कोणत्या गोष्टी करू नका. पैसे वेळ या दोन्हीचा ताळमेळ साधा. गोष्टी मनासारख्या घडतील असे नाही तर आहे त्यात सुख मानावे लागेल.

मीन : लाभ मिळण्याचा दिवस

जुन्या केलेल्या गोष्टींचे लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. सर्वांच्या सहकार्याने दिवस चांगला जाणार आहे. स्नेहभोजनाचे योग येतील. मजा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT