Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : जुनी गुंतवणूक फळाला येईल; तर काहींनी घ्यावी जोडीदाराच्या तब्येतीची काळजी; वाचा नशिबात आज काय लिहिलं?

Horoscope Today in Marathi : आज काही राशींच्या लोकांसाठी जुनी गुंतवणूक फळाला येईल. तर काहींनी जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावील. वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,२३ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी- अष्टमी १७|०८

रास- कन्या

नक्षत्र-उत्तरा

योग- सौभाग्य

करण- कौलव

दिनविशेष- उत्तम दिवस

मेष - मनामध्ये विनाकारण नकारात्मक विचार येतील. याचा परिणाम आपल्या दिवसभरात कामावर चिडचिड या स्वरूपात असेल. जवळच्या लोकांना जवळ करा तर दिवस थोडा निभावून जाईल.

वृषभ - "सरड्याची झेप कुंपणापर्यंत" अशा गोष्टी आज घडतील. धनलाभाच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. संततीकडून सुवार्ता समजतील. क्रीडा क्षेत्रात, कला क्षेत्रात प्रगती साधाल.

मिथुन - आज विशेष लक्ष्मी विष्णू योग आपल्याला साधणार आहे. घरामध्ये चांगल्या गोष्टींची खरेदी होईल. एखाद्या धार्मिक कार्य होईल.घरी वातावरण प्रसन्न आणि आनंददायी राहील.

कर्क - छोट्या प्रवासामधून फायदा होईल. जवळचे व्यक्ती आपल्यावर हेव्याने पाहतील. पण हीच खरं तर तुमच्या प्रगतीची वाट आहे सर्व बंधने तोडून नव्या आकाशात पुढे घेण्याचा हा आजचा दिवस आहे.

सिंह - कुटुंबात आपला वरचष्मा राहील. आपल्या स्तुतिप्रिय स्वभावाप्रमाणे दिमाखात राहायला आज आवडेल. स्वतःवर खुश व्हाल. दिवस आनंदी आहे.

कन्या - हसून सगळ्यांचं मन जिंकल तारतम्याने नियोजन केलेल्या गोष्टी आणि त्याचे अंदाज दोन्ही अचूक ठरल्यामुळे यशाचा आलेख चढता राहील. दिवस आनंदी आहे.

तूळ - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. विनाकारण पैसा खर्च होईल. योग्य प्रकारे उपचार होतीलच अशी आज खात्री नाही. थोडा संयम धरावा असे दिवस सांगतो आहे.

वृश्चिक - जुनी गुंतवणूक फळाला येईल. भगवंताने दिले आहे त्यामध्ये अजून प्रयत्नांनी यश मिळवण्याचा प्रयत्न करा. तर यश खेचून आणाल. पराक्रम चढता राहील. लाभ पदरात पडतील.

धनु - आपल्या लहरीपणामुळे सहकारी संभ्रमित असतील. योग्य बैठक घेऊन आपल्या निर्णय त्यांच्यापुढे मांडल्यास कामे अनायसे पार पडतील. समाजकार्यात आपले स्थान वरच्या पदावर असेल.

मकर - खडतर अडचणी आल्या तरी दिवसाची इतिश्री सुखाची राहील. ज्येष्ठांचा आशीर्वादाने पुढे जाल. शिव उपासना आज फलदायी ठरेल.

कुंभ - प्रेमात अपयश संभवते आहे. घेतलेल्या कामांमध्ये अडथळे येतील. मात्र धनाच्या दृष्टीने पैसा सकारात्मक दिशा देत आहे. संधीचे सोने करा.

मीन - व्यवसायात आणि घरी दोन्हीकडे भागीदार आणि जोडीदार यांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना तारेवरची कसरत होईल. पण योग्य रीतीने ते सर्व सांभाळाल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT