Rahu Gochar saam tv
राशिभविष्य

Rahu Gochar: शनीच्या घरात होणार राहूचा प्रवेश; 18 वर्षांनी तीन राशींवर बरसणार पैसा

Rahu Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १८ मे रोजी पापी ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. राहूच्या या गोचरमुळे तिन्ही राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार यश आणि नोकरी-व्यवसायात नफा मिळू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्यात अनेक ग्रह त्याच्या राशी किंवा नक्षत्रामध्ये बदल करणार आहे. या महिन्यात होणारी ग्रहांची स्थिती खूप खास आहे, कारण देवांचा गुरु बृहस्पति मिथुन राशीत प्रवेश केला आहे. यावेळी पापी ग्रह राहू लवकरच मीन राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार परवा म्हणजेच १८ मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता राहू ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहे. राहू कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना काय फायदा मिळणार आहे ते पाहूयात.

मकर रास

राहू आपली राशी बदलून कुंभ राशीत गोचर करणार आहे. या राशीला शनी साडेसातीच्या घटनेपासूनही आराम मिळाला आहे. राहू कुंभ राशीत प्रवेश केल्यावर या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. पैशांबाबत तुमचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होऊ शकणार आहे. जास्त पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

धनु रास

राहू आपली राशी बदलून कुंभ राशीत गोचर करणार आहे. या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमचा गमावलेला सन्मान परत मिळवू शकणार आात. राहू तुम्हाला हुशार बनवेल. जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. तुम्ही यशाची शिडी चढत राहणार आहात.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभ राशीत प्रवेश अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपणार आहेत. तुमचं बिघडलेलं काम अचानक पूर्ण होणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी होणार आहात. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला कोणत्याही व्यवसायासाठी किंवा इतर कामासाठी कर्ज मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT