Rahu Gochar 2025 In Kumbh saam tv
राशिभविष्य

Rahu Gochar: राहू मिळवून देणार 'या' राशींना बक्कळ पैसा; धनलाभासोबत मिळणार करियरमध्ये चांगली संधी

Rahu Gochar 2025 In Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. येत्या काळात राहू ग्रह गोचर करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यावेळी मायावी ग्रह राहू देखील राशी परिवर्तन करतो. शास्त्रानुसार, राहू ग्रह एका राशीमध्ये सुमारे १८ महिने राहतो. राहु ग्रह सध्या मीन राशीत भ्रमण करत असून 18 मे 2025 रोजी राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत कुंभ राशीत राहणार आहे. अशा स्थितीत राहूच्या गोचरमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काही राशींना प्रत्येक कामात लाभ मिळणार आहे, तर काही राशींच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

मेष रास

राहू ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला भरपूर लाभ देणार आहे.

वृषभ रास

राहू ग्रहाचं गोचर या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी व्यापारात तुम्हाला चांगला पैसा मिळणार असून नवीन काम देखील हाती येणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होऊ शकणार आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास

राहूच्या गोचरचा सर्वात जास्त फायदा या राशीला होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होणार आहे. ज्या व्यक्ती बरोजगार आहेत किंवा ज्यांना नोकरीची गरज आहे, त्यांना नोकरी मिळू शकते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT