Laxmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan RajYog: दिवाळीनंतर बनणार पॉवरफुल लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Lakshmi Narayan Rajyog after Diwali: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र या दोन महत्त्वाच्या ग्रहांची एकाच राशीत होणारी युती 'लक्ष्मी नारायण राजयोग' (Lakshmi Narayan Raj Yoga) नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ योग निर्माण करते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार या वर्षी दिवाळीनंतर अनेक ग्रहांचं गोचर आणि राजयोग निर्माण होणार आहेत. त्यात बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या लक्ष्मी-नारायण राजयोगाचाही समावेश आहे. या राजयोगाचा प्रभाव नोव्हेंबर महिन्यात वृश्चिक राशीत जाणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, दिवाळीनंतर काही राशींच्या व्यक्तींचं भाग्य चमकू शकणार आहे. तसंच करिअरमध्ये प्रगतीसह उत्पन्नातही भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना त्याच्या फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग त्यांच्या लग्न भावावर निर्माण होणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक चांगलं होणार आहे. व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी उघडणार आहे. तर आधी थांबलेलं प्रोजेक्ट पुन्हा गती पकडू शकणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण राजयोगामुळे शुभ काळ सुरू होऊ शकणार आहे. कारण हा राजयोग त्यांच्या चतुर्थ भावावर तयार होतोय. या काळात भौतिक सुख मिळू शकणार आहेत. वाहन किंवा मालमत्तेची मिळकत होऊ शकणार आहे. व्यवसाय करणार्‍यांना नवीन डील किंवा भागीदारीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

मेष राशि (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठीही लक्ष्मी-नारायण राजयोग लाभदायी ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला नशीबाचा पाठीराखा मिळणार आहे. सरकारी नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी यश मिळण्याची संधी अधिक आहे. त्याचप्रमाणे धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. लहान किंवा मोठा प्रवास करण्याची संधी देखील आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT