September Grah Gochar saam tv
राशिभविष्य

September Grah Gochar: सप्टेंबर महिन्यात बुध, सूर्यासह ३ ग्रह बदलणार रास; 'या' राशींचं नशीब फळफळणार

September Grah Gochar : येत्या सप्टेंबर महिन्यात सूर्य आणि बुधासह तीन मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहेत. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात ग्रहांच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. जसा महिना बदलतो तसं ग्रह त्यांच्या वेळेनुसार गोचर करतात. दर महिन्याला ग्रहांचं गोचर होत असून लवकरच सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात सूर्य आणि बुधासह तीन मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह 4 सप्टेंबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 16 सप्टेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत गोचर करणार आहे. महिन्याच्या अखेरीस 23 सप्टेंबर रोजी, बुध ग्रह पुन्हा एकदा सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये सप्टेंबर महिन्यात काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. याशिवाय काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात ग्रहांच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

मेष रास (Aries Zodiac)

सप्टेंबर महिना या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या महिन्यात नोकरी करणाऱ्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणाहून ऑफरही मिळू शकणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि यावेळी व्यापारी काही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात. पैशाची आवक चांगली राहणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात बुधादित्य राजयोग तयार होणार असून या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. ज्या लोकांना नोकरी बदलायची असेल तर तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT