Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना शेअर्समधून मोठे लाभ होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात काही राशींच्या लोकांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ज्योतिषांच्या मते, मेष, मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

घर-वाहन खरेदीसाठी उत्तम काळ राहील. शुभकार्यासाठी खर्च होतील. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे मोठे प्रवास होतील. मात्र, चंद्र-शनी योगामुळे तब्येत नरमगरम राहील. प्रवासात विलंब किंवा अडचणी येतील.

वृषभ

सप्ताहाच्या सुरुवातीला नवीन ओळखी होतील. तरुणांचे विवाह जमतील. कोर्ट-कचेरी वादविवादात सामंजस्याने निर्णय होतील. पैशांची कामे विलंबाने होतील. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.

मिथुन

नोकरी-व्यवसायात चांगले बदल होतील. उत्पन्नात वाढ होईल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. कामाचा ताण वाढण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात मोठे प्रवास होतील. कर्जाची कामे होतील.

कर्क

धार्मिक, मंगल कार्ये होतील. तीर्थयात्रा छोटे प्रवास होतील. महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. प्रवासात अडथळे येतील. उत्तरार्धात नोकरीमध्ये पदोन्नती-बदली संभवते. निवडणुकीत यश मिळेल.

सिंह

चंद्र-गुरू शुभ योगामुळे अचानक मोठे लाभ होतील. घर, मालमत्तेमधून पैसा मिळेल. जागा-घराचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कन्या

भागीदारीच्या व्यवसायात लाभहोतील. कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्णय होतील. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. भावंडे-नातेवाइकांशी संबंध सुधारतील. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल.

तूळ

नोकरीमध्ये अनुकूल बदल संभवतो. वरिष्ठांची मर्जी राखाल. हाताखालच्या लोकांकडून मोठी मदत होईल. कर्जाच्या कामात विलंब-कायदेशीर अडथळा निर्माण होईल. कौटुंबिक सलोखा वाढेल.

वृश्चिक

मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. शेअर बाजारात अडकलेले पैसे मोकळे होतील. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे मन आनंदी-उत्साही राहील. कला-खेळ-स्पर्धेमध्ये यश मिळेल.

धनू

चंद्र-गुरू शुभ योगामुळे कर्जाची कामे सुलभ होतील. वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल. उत्तरार्धात नोकरीमध्ये प्रमोशन, वेतनवाढ मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मकर

विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. भावंडांसंबंधित शुभवार्ता कळेल. घर-जागेमधून लाभ होईल. मुलांबरोबर मतभेद होतील. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल.

कुंभ

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात विवाह-मंगलकार्य ठरतील. नोकरीमध्ये वेतनवाढ होईल. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे नवीन नोकरीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.

मीन

संततीकडून सौख्य मिळेल. शेअर्समधून लाभ होतील. धार्मिक मंगल कार्यातून आनंद घ्याल. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे मन आनंदी-उत्साही राहील. कला, खेळ यांमधून प्रसिद्धी-यश-नावलौकिक वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: हनुमानाची मिळणार या राशींना कृपा, साडेसाती दूर अन् यशाचे मार्ग खुले; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Horoscope Today : सोमवारचा दिवस ४ राशींसाठी ठरणार भाग्याचा; ८ राशींचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

LPG Cylinder Price : LPG सिलिंडर पुन्हा स्वस्त झाला, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

Maharashtra Politics: 'महायुती'तला बेबनाव दिल्लीपर्यंत; भाजप बाटलेली, अजितदादांच्या मंत्र्याचा हल्लाबोल

Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; सोलापुरात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT