Guru Shukra Yuti  Saam Tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: दिवाळीला 'या' राशींवर बरसणार नुसता पैसा; समसप्तक योगामुळे मिळणार संपत्ती

Guru Shukra Yuti 2024: यंदाच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजन करण्यात येणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी दोन ग्रहांच्या युतीमुळे खास राजयोगाची निर्मिती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. वैदिक पंचागानुसार, यंदाच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजन करण्यात येणार आहे. यंदाची दिवाळी ही ज्योतिश्य शास्त्रानुसार, देखील फार महत्त्वाची आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी दोन ग्रहांच्या युतीमुळे खास राजयोगाची निर्मिती होणार आहे. वृषभ राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे दिवाळीच्या दिवशी समसप्तक योग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळू शकणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मिथुन रास

समसप्तक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

धनु रास

समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे धनु राशीच्या लोकांचं आयुष्य सुखकर होणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळणार आहेत. यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्यही वाढू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ होणार आहे.

कन्या रास

समसप्तक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. भविष्यात चांगला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. अडकलेले पैसेही मिळू शकणार आहात. विवाहितांच्या कौटुंबिक जीवनात गोडवा राहणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अखेर दोन्ही शिवसेना एकत्र! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी चमत्कार

Brushing Teeth At Night: रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचे फायदे काय ?

Shilpa Shetty Photos: बोल्ड अन् ब्युटिफूल शिल्पा शेट्टीचा नवा लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये घातलाय धुमाकूळ

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

SCROLL FOR NEXT