Gajkesari Rajyog 2024 saam tv
राशिभविष्य

Gajkesari Yog 2024: १३ डिसेंबरला गुरु-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Gajkesari Yog 2024: गुरु सध्या वृषभ राशीमध्ये स्थित आहे. अशा स्थितीत बृहस्पति चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे राजयोगांची निर्मिती होते. यामध्ये चंद्र हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात वेगाने फिरतो. तो एका राशीत फक्त अडीच दिवस राहतो. याशिवाय गुरु सध्या वृषभ राशीमध्ये स्थित आहे. अशा स्थितीत बृहस्पति चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होतो.

गजकेसरी राजयोग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळ टिकून राहू शकतो. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे ते पाहूयात.

पंचांगानुसार 13 डिसेंबर रोजी दुपारी 1:18 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी गुरु बृहस्पती आधीच उपस्थित असल्याने चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकणार आहे. तुम्हाला काही नवीन प्रकल्प मिळू शकतात. जीवनात अनेक सुखाचे क्षण दार ठोठावू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

वृषभ रास

या राशीच्या चढत्या घरात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

कन्या रास

या राशीच्या चढत्या घरात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीचं काम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. यासोबतच आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता वाढेल. तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT