Numerology Predictions in Marathi Saam TV
राशिभविष्य

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Anjali Potdar

ज्यांचा जन्म कोणत्याही तारखेचा ८,१७,२६ तारखेला झाला आहे त्यांचा भाग्यांक आठ आहे. शनी हा ग्रह याचा कारक आहे. कडक शिस्तीचे भोक्ते , स्थिर, कर्तव्य तत्पर आणि निश्चयी असे तुम्ही आहात. शांतता एकांतप्रिय गोष्टींची आवड असते. शास्त्रीय संगीताची गंभीर प्रकारचे संगीता विषयी ओढ वाटते. निसर्ग सौंदर्य फुले, रम्य रेखावा बद्दल ओढ असते. आपला समतोल स्वभाव असून दोन्ही बाजूंचा विचार करणारे आहात.

तुमच्यात काही प्रमाणात निराशावाद आहेत. समाजात राहण्यापेक्षा त्यापासून दूर राहणे आवडते. भविष्याबद्दल अत्यंत काळजी घेणे. ऐहिक गोष्टींबद्दल काळजीपूर्वक विचार करणे ही वैशिष्ट्ये आहेत. सर्व अंकांमध्ये तुमचा अंक धोरणी, हुशार आणि गंभीर आहे. तुम्ही कधी उत्साही नसता. कमी अधिक प्रमाणात तुमच्यात खिन्नता आढळते.

महत्त्वाकांक्षी आणि दीर्घोउद्योगी आहात. हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आहे. संशयखोर वृत्ती आणि चिवटपणा असतो. तुम्ही कार्यमग्न, कार्यक्षम आणि अधिकार गाजवणाऱ्या असता. तुमच्याबद्दल काही वेळा गैरसमज करून घेतले जातात. समाजात वावरत असला तरी सुद्धा आपण एकटे आहोत याची जाणीव असते.

गरीब,दुःखी लोकांबद्दल आदरणीय आपुलकी असते. जन्मतः उत्तम व्यवस्थापक असल्यामुळे इतरांकडून कामे करून घेणे जमते. न्याय, योग्य गोष्टीं बद्दल आदर असतो त्यासाठी मोबदला देण्यासाठी तुम्ही तयार असता. अडचणी आणि विलंब यात जीवनामध्ये भरपूर अनुभव येतात.

नोकरी व्यवसायाचा विचार केला तर अनेक पद्धतीचे व्यवसाय तुम्ही करू शकता. नक्की व्यवसाय सांगणे अवघड आहे. पण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित शास्त्र यामध्ये तुमची प्रगती आहे. कोळशाच्या खा, लाकूड व्यवसाय, लोखंड अश्या उद्योगांमध्ये यशस्वी व्हाल. उत्तम व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी होऊ शकता.

नोकरी आणि व्यवसायात फार कष्ट घ्यावे लागतील आणि त्याची फळे उशिरा मिळतील. रोग आजाराचा विचार केला तर मूळ म्हणजे मानसिक आणि चिडखोरपणा तसेच पाय, कान, दाताचे विकार, अर्धांग वायू, संधिवात यापासून त्रास संभवतो. प्रकृती पित्तकारक असते. बऱ्याच वेळा दीर्घकालीन नैराश्याचा त्रास होतो .आठ हा अंक विलंब आणि कष्ट त्यामुळे होणारे आजार बराच काळ रेंगाळणारे आजार वेरिकोज व्हेन्स हे आजार उद्भवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT