Numerology Number 7 Saam Tv
राशिभविष्य

Numerology Number 7 : पैसे मिळवण्याची कला, स्वतंत्र वृत्ती; ७,१६,२५ तारखेला जन्मलेले व्यक्ती कसे असतात? वाचा भाग्यांक

Bhagyank 7, Life Path Number 7 in Numerology: आज जाणून घेऊ ज्यांचं भाग्यांक ७ असतं, ती व्यक्ती कशी असते, त्याचा स्वभाव कसा असतो...

Anjali Potdar

ज्यांचा जन्म कोणत्याही तारखेला ७,१६,२५ या तारखाना झालाय त्यांचा भाग्यांक सात आहे. हा नेपच्यूनच्या ग्रहा कडे येणारा आकडा आहे. तुमचे व्यक्तिमत्व मुळातच स्वतंत्र आहे. प्रकृती निसर्गतः अस्वस्थ असते. तुम्हाला दूरच्या देशाबद्दल आवड आहे. काही निमित्ताने परदेशाशी संबंध येतो.

धार्मिक रूढी विषयच चमत्कारिक कल्पना असतात. ठराविक चाकोरीतूनच जाणे आपल्याला आवडते. हा अध्यात्मिक तत्त्वाचा ग्रह आहे त्यामुळे उच्च कोटीचा अहंकार वैयक्तिक रित्या जोपासता. पक्षाप्रमाणे स्वैर आणि स्वतंत्र वृत्ती असते. परंपरागत रुढीबद्दल तिरस्कार असतो. मोठे मोठे भविष्य आणि अध्यात्मवादी या ग्रहाच्या प्रभवावर असतात.

तुमची वागणूक बऱ्याच वेळा गूढ असते. शुद्ध विचार करून ध्येयपूर्ती होते. काही वेळेला दुराग्रही आणि दुसऱ्यांच्या मतांची उपेक्षा केले जाते. पैसे मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. तुम्ही उदास आणि अलिप्त व्यक्तीच असता. चांगल्या गोष्टीची निवड करता. भावनाप्रधान असूनही मूळ भावना लपवण्याकडे कल असतो. सर्वसाधारण विचारसरणीच्या आणि सामान्य माणसांमध्ये मिसळणे आपल्याला आवडत नाही. आयुष्यात सातत्याने बदल आवडतो. आवडत्या पुस्तकाबरोबर तासनतास वेळ घालवता. स्वतःचे ज्ञान आणि अधिकाराची तुम्हाला पूर्ण जाणीव असते. सल्ला विचारल्यास अधिकार पणाने आणि खंबीरपणे त्याला उत्तरे तुम्ही देता.

नोकरी व्यवसायाचा विचार केला तर, अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्हाला उपलब्ध आहेत. तरीसुद्धा तुमचा कल परदेशाबद्दल आकर्षण असल्यामुळे परदेशातील मालाची ने आण या व्यवसायात यश मिळेल. इम्पोर्ट एक्स्पोर्ट, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स हे व्यवसाय तसेच वैद्यकीय क्षेत्रातही तुम्ही चमकू शकाल.

रोग आजाराचा विचार केला तर, मनाशी निगडित असणारे रोग येतील. रक्ताभिसरण, पोटाच्या तक्रारी, ताप या गोष्टी होऊ शकतात. अति श्रमणे, मनावरील दडपण यापासून दूर राहणे आपल्याला गरजेचे आहे. आपल्या कामाचे तास आणि विश्रांतीच्या वेळी याची योग्य ती सांगड घातल्यास तब्येत ठीक राहील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

SCROLL FOR NEXT