Guru Gochar saam tv
राशिभविष्य

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी गुरु ग्रहाचं गोचर 'या' राशींना फळणार; उत्पन्नात प्रचंड वाढ, करियमध्येही होणार प्रगती

Guru Gochar 2025: जर एखाद्या ग्रहाने आपली राशी किंवा नक्षत्र बदललं तर त्याचा 12 राशींवर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होतात. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक ठराविक महत्त्व देण्यात आलं आहे. यावेळी नऊ ग्रहांपैकी गुरु म्हणजेच बृहस्पतीलाही विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. जर एखाद्या ग्रहाने आपली राशी किंवा नक्षत्र बदललं तर त्याचा 12 राशींवर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होतात. 2025 मध्ये गुरू ग्रह देखील राशी बदलणार आहे. सुमारे 13 महिन्यानंतर गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.

२०२५ मध्ये गुरु ग्रह कधी करणार राशी परिवर्तन?

वर्ष 2025 मध्ये 14 मे 2025 रोजी बृहस्पती राशी बदलणार आहे. या तारखेला गुरू रात्री 11:20 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सध्या गुरु वृषभ राशीत आहे. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचं गोचर लाभदायक ठरणार आहे. 2025 हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप खास असणार आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या काळात प्रगतीमुळे समाजात तुमचा सन्मान वाढू शकणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते.

कुंभ

कुंभ राशीसाठी गुरूचं गोचर लाभदायक ठरणार आहे. जुन्या मित्रांची भेट होणार आहे. नोकरदारांचे पगार वाढतील. गुरूचं गोचर तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे.

मिथुन रास

2025 मध्ये गुरू गोचरमुळे मिथुन राशीच्या जीवनात अनेक बदल घडण्याची शक्यता आहेत. गुरूच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगलं राहणार आहे. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांशी तुमचे संबंध सुधारू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

SCROLL FOR NEXT