NeechBhang Rajyog saam tv
राशिभविष्य

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

NeechBhang Rajyog: मंगळ कर्क राशीत आणि चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. यामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतरानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ राजयोग तयार होतात. ग्रहांच्या गोचरमुळे किंवा युतीमुळे तयार झालेल्या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या आयुष्यावर होत असतो. येत्या काळात असाच एक राजयोग तयार होणार आहे.

ग्रहांचा सेनापती मंगळ कर्क राशीत आणि चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. यामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. चंद्र तुमच्या राशीतून नवव्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. तुम्हाला व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकणार आहे.

कर्क रास

नीचभंग राजयोगाची रचना कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगलं असणार आहे. लव्ह लाईफ देखील चांगली राहणार आहे. उत्पन्न वाढल्याने उत्पन्नाचे स्रोतही निश्चित होऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकणार आहे.

मेष रास

नीचभंग राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकणार आहे. या काळात तुम्ही जमीन आणि मालमत्तेचे सौदे करू शकता. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायातून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT