Shani Margi Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: 'या' ५ राशींकडे चुंबकासारखा खेचून येतो पैसा; सदैव राहते देवी लक्ष्मीची कृपा

Zodiac Signs Money: ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही व्यक्तींवर लक्ष्मीची कृपा असते. काही राशी लक्ष्मीला फार आवडतात. अशा व्यक्तींकडे कधीही पैशांची कमतरता दिसून येत नाही.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पैसे हवे असतात. अनेकजण बुद्धीचा वापर करून श्रीमंत देखील बनतात. ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही व्यक्तींवर लक्ष्मीची कृपा असते. काही राशी लक्ष्मीला फार आवडतात. अशा व्यक्तींकडे कधीही पैशांची कमतरता दिसून येत नाही.

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांच्याकडे पैसे आपोआप येतात. पैशाच्या बाबतीत त्या राशींचे लोक खूप भाग्यवान असतात, असं मानलं जातं. आम्ही तुम्हाला अशा 5 राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करण्याची क्षमता असते. जाणून घेऊया कोणत्या 5 राशी आहेत ज्या सर्वात जास्त पैसा आकर्षित करतात.

वृषभ रास

वृषभ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे. या राशीच्या लोकांना पैशाचं महत्त्व माहिती असतं. या राशींच्या व्यक्तींना कष्टाने पैसे कमवायला आवडते. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो.

धनु रास

धनु राशीचा शासक ग्रह गुरू मानला जातो. या राशीच्या लोकांना धोका पत्करणं आवडतं. त्याचप्रमाणे या राशींच्या व्यक्ती पैशांच्या बाबतीत भाग्यवान मानल्या जातात. प्रत्येकजण सकारात्मक विचार करून काम करतो.

मकर रास

मकर राशीचा शासक ग्रह शनी आहे. धनप्राप्तीच्या बाबतीतही ही राशी भाग्यवान मानली जाते. या राशीचे लोक मेहनती असतात. त्याचप्रमाणे या व्यक्ती नेहमी त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतात. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवायला आवडतं.

तूळ रास

तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र असून ही राशी सर्व प्रकारच्या सुखसोयींचा आनंद घेण्यासाठी ओळखली जाते. पैशाशी संबंधित समस्यांना कधीही सामोरं जावं लागत नाही, असं दिसून येतं. त्याचप्रमाणे त्यांना गुंतवणूक करायला आवडते.

मीन रास

मीन राशीचा शासक ग्रह गुरू असून कमी कमाई करूनही या राशींच्या व्यक्ती अधिक पैसे कमावतात. पैशाशी संबंधित यांना शक्यतो कोणतीही समस्या येत नाही. पैसे कमावण्याच्या बाबतीत या राशी लकी मानल्या जातात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Flood: दर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या; सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार?

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

Sudha Murty: खासदार सुधा मूर्ती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर; अश्लील व्हिडिओच्या नावे दिली धमकी

S. L. Bhyrappa Death : सुप्रसिद्ध लेखकाचं बेंगळुरुत निधन; हृदयरोगाशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT