Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : आपले कोण परके कोण ओळखा, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांना महिन्याचा पहिला दिवस अडचणीचा जाणार

Monday Horoscope In Marathi : काही राशींच्या लोकांना माणसे ओळखावी लागतील. तर काहींचा महिन्याचा पहिला दिवस अडचणीचा जाण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,१ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष शुक्लपक्ष,

मोक्षदा एकादशी,गीता जयंती.

तिथी-एकादशी १९|०२

रास-मीन २३|१८ नं. मेष

नक्षत्र-रेवती

योग-व्यतिपात

करण-वणिज

दिनविशेष-व्यतिपात वर्ज्य

मेष -आपल्या राशीला आज, आत्ता, ताबडतोब अशी मानसिकता आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता आज तुम्ही कामे कराल. काही जणांचा अध्यात्माकडे कल राहील. मोक्षदा एकादशीचे उत्तम फल मिळेल.दिवस संमिश्र आहे.

वृषभ - मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने मन प्रसन्न, प्रफुल्लित राहील. काहींचे वैचारिक परिवर्तनही होईल. अडकलेल्या, दिरंगाई मध्ये, रेंगाळलेल्या गोष्टी आज सुकर होतील.

मिथुन - तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज सुसंधी लाभणार आहे. जे ठरवाल ते होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल.कर्म प्रधानता राहील.

कर्क - भावनिकतेने ओथंबलेली आपली रास आहे. मात्र आज आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. भाग्याची दालने आपोआप उघडतील. काहींना तीर्थयात्रेचे योग दिसत आहेत. आज मोक्षदा एकादशी विशेष विष्णू उपासना करावी.

सिंह - दैनंदिन कामे रखडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मान, अपमान, खरेखोटेपणा, चांगले, वाईट या सर्व गोष्टींमध्ये व्यापलेला आजचा दिवस असेल.

कन्या - तडजोड करतच आयुष्य जगावे लागते अशी काहीशी आपली रास आहे. आज वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल .आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. स्वतःचे मनस्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी दुसऱ्याला समजून घेणे आज गरजेचे ठरेल.

तूळ - कर्मचारी वर्गाच्या सहकाऱ्याने पुढे जाणार आहात. आपले कोण परके कोण हे ओळखून वागावे लागेल. हित शत्रूंवर मात कराल. दिवस अडचणीचा असला तरी सुद्धा दिवसाच्या शेवटी मार्ग निघालेला असेल.

वृश्चिक - मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. एकूणच आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. उपासनेमध्ये कुलदेवतेची उपासना आज विशेष फलदायी ठरेल.

धनु - प्रॉपर्टी सौख्य आपल्या राशीला चांगले आहे. काहींना कामानिमित्त प्रवासही घडतील. कौटुंबिक सौख्य चांगले राहून घरातील एकमेका व्यक्तींच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत.

मकर - न ठरवता अचानक काही गोष्टी घडतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. पण ती तुम्ही निभावूनही न्याल. नातेवाईकांचे चांगले सहकार्य मिळेल. आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल.

कुंभ - दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. मन आशावादी आणि आनंदी राहील. गुंतवणुकीसाठी जर काही गोष्टी शोधत असाल तर आज योग्य गुंतवणूक करायला दिवस चांगला आहे. वारसा हक्काची संपत्ती मिळेल.

मीन - स्वतःसाठी जगण्याचा आज अट्टाहास असेल. इतरांवर तुमचा प्रभावही राहील. मनोबल उत्तम राहिल्यामुळे दिवस आनंदी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

SCROLL FOR NEXT