Budh Gochar Saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: २ दिवसांनी बुध करणार गोचर; या राशींच्या धनसंपत्तीत होणार अचानक वाढ

Budh Gochar In December 2025: ज्योतिषांच्या मते, बुध ग्रहाचा गोचर पुढील २ दिवसांत होणार आहे. या बदलामुळे काही राशींना अचानक धनलाभ, व्यवसायात प्रगती आणि आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार बुध ग्रह तर्कशक्ती, वाणी, व्यापार, संवाद, शेअर बाजार, गणित आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाचा गोचर सर्व राशींवर परिणाम करणार आहे.

6 डिसेंबर रोजी व्यापाराचा दाता बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या या बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. त्याचप्रमाणे काही राशींचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाच्या या गोचरमुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृश्चिक रास

बुध ग्रहाचा राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्ही लोकप्रिय होणार आहात. पदोन्नतीचे योग तयार होणार आहे. विवाहितांसाठी वैवाहिक जीवन आनंदी राहील. पार्टनरशिपमधील कामातून लाभ मिळेल.

मकर रास

मकर राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाचा गोचर लाभदायी ठरणार आहे. बुध तुमच्या गोचर कुंडलीतील उत्पन्न आणि लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यशच मिळणार आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाचा गोचर लाभप्रद ठरणार आहे. बुध तुमच्या राशीपासून कर्मभावात संचरण करणार आहे. त्यामुळे कामकाज आणि व्यवसायात विशेष प्रगती होणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला जीवनात सुखद अनुभव मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जात होता?

Mix Vegetable Cutlet: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मिक्स भाज्यांचे क्रिस्पी कटलेट; ५ मिनिटात होईल तयार

Viral Video: कष्टाची ताकद काय असते? ६० किलो वजन उचलणाऱ्या शेतकऱ्याच्या वाघीणीचा व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Mayor List : तुमच्या शहराचा कारभारी कोण? मुंबई, ठाण्यापासून सोलापूर ते नागपूरपर्यंत २९ महापालिकांच्या महापौर-उपमहापौरांची संपूर्ण यादी

Rahul Gandhi: हे ट्रेड डील नाही तर होलसेल सरेंडर; राहुल गांधींच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

SCROLL FOR NEXT