Budh Uday saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: डिसेंबर महिन्यात ५ वेळा गोचर करणार बुध ग्रह; 'या' ३ राशींचे येणार अच्छे दिन

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात बुध ग्रह तब्बल ५ वेळा संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे संक्रमण जीवनात महत्त्वाचे बदल घडवते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार मानण्यात येतं. बुध ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्रामध्ये गोचर करतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. साधारणपणे बुध दर 15 दिवसांनी राशी आणि 10 दिवसांनी नक्षत्र बदलतो.

साल 2025 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये बुध वृश्चिक आणि धनु राशीत प्रवेश करेल. यासोबतच तो अनुराधा, ज्येष्ठा आणि मूल नक्षत्रात गोचर करेल. बुधाच्या या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल, मात्र तीन राशींना विशेष लाभ मिळू शकतो. या राशींच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढणार आहे.

केव्हा केव्हा होणार बुधाचं गोचर?

वैदिक ज्योतिषानुसार, व्यापाराचा कारक बुध 6 डिसेंबरला वृश्चिक राशीत आणि 29 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे. 10 डिसेंबरला बुध विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात जाणार आहे. 20 डिसेंबरला ज्येष्ठा नक्षत्रात आणि शेवटी 29 डिसेंबरला मूल नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी डिसेंबर महिना अत्यंत खास ठरणार आहे. दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. करिअरमध्ये लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे. जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या जातकांसाठीही डिसेंबरमध्ये बुधाच्या स्थितीतील बदल लाभदायी ठरणार आहे. या राशीत बुध दुसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे. घरात एखादं मंगलकार्य घडणार आहे. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत प्रेमळ क्षण घालवाल.

तूळ रास (Tula Zodiac)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुध दुसऱ्या आणि तिसऱ्या भावात राहणार आहे. नवीन संधी मिळणार असून जीवनात सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. एकापेक्षा जास्त व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत वेगाने सुधारणा होणार आहे. धन कमावण्याचे अनेक मार्ग मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: उद्या बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींचा पैसा आणि संपत्ती दुप्पटीने वाढणार

Makar Sankranti 2026: केवळ फॅशन म्हणून नाही तर का घालतात संक्रांतीला हलव्याचे दागिने? जाणून घ्या खरं कारण

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा शंखनाद! कधी आणि कोणती निवडणूक होणार? जाणून घ्या A टू Z माहिती|VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबई नेरुळमध्ये अडीच लाख रुपये जप्त; मतदारांच्या यादीसह एकाला ताब्यात

Municipal Election 2026: प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

SCROLL FOR NEXT