Budh Shukra Yuti saam tv
राशिभविष्य

Budh Shukra Yuti: 5 वर्षांनंतर बुध-शुक्राची होणार युती; यंदाच्या दिवाळीत मालामाल होणार 'या' राशी

Mercury And Venus Conjunction In Tula 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शुक्र हे नैसर्गिकरीत्या शुभ ग्रह मानले जातात. बुध बुद्धी, वाणी, व्यापार आणि तर्कशक्तीचा कारक आहे, तर शुक्र प्रेम, सौंदर्य, भौतिक सुख आणि धन-संपत्तीचा कारक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह बुद्धी, ज्ञान आणि कामाचा प्रतिनिधी मानला जातो. तर शुक्र ग्रह सौंदर्य, ऐश्वर्य आणि वैभवाचा कारक आहे. ज्यावेळी हे दोन्ही शक्तिशाली ग्रह एकत्र येतात, तेव्हा सर्व राशींच्या व्यक्तीवर त्याचा शुभ परिणाम होतो. यावेळी अनेकांची अडकलेली कामं पूर्ण होतात, आर्थिक अडथळे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतो.

यंदा नोव्हेंबरमध्ये अशीच एक शुभ युती होणार आहे. ज्यामध्ये बुध आणि शुक्र एकाच राशीत एकत्र येणार आहे. या योगाचा फायदा काही खास राशींना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. काही राशींना यावेळी अडकलेला पैसा मिळू शकतो तर काहींच्या करिअरमधील अडचणी दूर होऊ शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी ही युती विशेष अनुकूल ठरणार आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरी बदलू पाहत आहेत त्यांना प्रतिष्ठित कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. या बदलामुळे आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक समाधान लाभेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध-शुक्राची युती यशाचे दार खुले करणार आहे. तुमची वाणी प्रभावशाली राहील, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील आणि महत्त्वाची जबाबदारीही देऊ शकतात. जुना अडकलेला पैसा परत मिळू शकतो.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी ही युती आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. जोडीदारासोबतचं नातं अधिक गहिरं होणार आहे. तुमची व्यक्तिमत्त्व खुलून दिसणार आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि व्यापाराचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाची गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला; शेतमजूर वृद्ध महिलेचा मृत्यू

Nashik To Amravati: नाशिक ते अमरावती जाण्यासाठी कोणता मार्ग उत्तम? वाचा सोपे टिप्स आणि ट्रिक्स

७५ वर्ष पूर्ण, आता मोदी रिटायर होत आहेत? एनडीएकडून मोदींचा सत्कार का झाला? बड्या खासदारानं सांगितलं..

Maharashtra Live News Update : पुणे पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक सुरू

Khalid Ka Shivaji Controversy : पुण्यात 'खालिद का शिवाजी' वादाच्या भोवऱ्यात, हिंदू महासंघ आक्रमक, वाचा नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT