Mercury-Venus In Cancer Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Yog: या 4 राशींसाठी येणारे 6 दिवस ठरणार खास, लक्ष्मी-नारायण योगाने होईल मोठा फायदा

साम टिव्ही ब्युरो

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक अंतराने राशिचक्र आणि नक्षत्र बदलतात. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत 12 राशींवरही पडतो. 29 जूनपासून मार बुध कर्क राशीत असून 19 जुलैपर्यंत या राशीत राहील. त्याचबरोबर शुक्राने देखील 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश केला असून 31 जुलैपर्यंत येथेच राहणार आहे.

ज्योतिषीय गणनेनुसार, 19 जुलै रोजी बुध सिंह राशीत जाईल. आगामी 6 दिवस कर्क राशीत लक्ष्मी नारायण योग तयार झाल्याने काही राशींना प्रचंड फायदा होईल. जीवनात अनेक महत्त्वाचे बदल होतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. जाणून घेऊया कर्क राशीत लक्ष्मी नारायण योग बनल्याने कोणत्या राशींना फायदा होईल...

मेष

लक्ष्मी-नारायण योगाचा मेष राशींच्या लोकसांठी फायदा होईल. कामाचे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती कराल.

सिंह

लक्ष्मी-नारायण योगाने तुमची सर्व कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये मोठे यश प्राप्त होईल. धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. विवाहित लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. या काळात तुम्हाला कामातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मकर

बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून भरपूर पैसा मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.

मीन

बुध आणि शुक्राची जोडी लाभदायक ठरेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले काम यशस्वी होईल. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, भाजपचा थेट सत्तेचा दावा

Madhya Pradesh Jabalpur Accident : भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Updates: आठ दिवसात रँडम सर्वे पूर्ण करून शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के अग्रीम; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी कटोरा घेऊन फिरत आहेत; बावनकुळेंची बोचरी टीका

Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला!

SCROLL FOR NEXT