Budh Ast 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Asta: 20 जानेवारीला बुध ग्रह होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Budh Asta 2025: बुध हा ग्रहांचा राजकुमार असून विशिष्ट कालावधीनंतर तो राशिचक्र बदलतो. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या राशीमध्ये एका ठराविक वेळेनंतर बदल करतात. गोचरप्रमाणे ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. यामध्ये बुद्धी आणि व्यापाराचा दात बुध ग्रह नवग्रहांमध्ये विशेष महत्त्व आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार असून विशिष्ट कालावधीनंतर तो राशिचक्र बदलतो. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो.

येत्या २० तारखेला बुध सकाळी 6:30 वाजता धनु राशीमध्ये अस्त होणार आहे. यानंतर 22 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 34 दिवसतो अस्त अवस्थेत राहणार आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना यावेळी सावध राहण्याची गरज आहे. बुध ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत ते पाहूयात.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव लाभदायक ठरू शकणार आहे. नोकरी आणि व्यवसायात भरपूर नफा मिळू शकणार आहे. तुम्ही कामासाठी खूप प्रवास करू शकणार आहात. तुम्हाला खूप फायदा होणार आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होणार आहे.

कन्या रास

बुध ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपुष्टात येणार आहे. या काळात करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला विशेष लाभ मिळू शकणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळू शकणार आहेत. आर्थिक नुकसानीची परिस्थिती दूर होऊ शकते. व्यवसायात उंची गाठू शकाल.

कुंभ रास

या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे. या राशीच्या अकराव्या घरात बुध अस्त करणार आहे. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होऊ शकतात. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT