Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: मंगळ 'या' राशींचं जीवन करणार अमंगल; शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने येणार भूकंप, राहा सावधान

Mangal Gochar 2025: जेव्हा मंगळ ग्रह त्याची हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर परिणाम होतो. काहींसाठी हा प्रभाव शुभ असतो तर काहींसाठी अशुभ असतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांच्या चालीला महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक ग्रहाला देखील एक वेगळं महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये मंगळ ग्रहाला खास महत्त्व असून त्याच्या चालीतील बदल फार महत्त्वाचा मानला जातोय. जेव्हा मंगळ ग्रह त्याची हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर परिणाम होतो. काहींसाठी हा प्रभाव शुभ असतो तर काहींसाठी अशुभ असतो.

येत्या १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३२ वाजता मंगळदेव शनिच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या काळात मंगळ कर्क राशीत असणार आहे. मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 'मंगळ पुष्य योग' तयार होणार आहे. दरम्यान ही स्थिती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार नाहीये. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

कर्क राशीत मंगळ असून या काळात तो मेष लग्नाच्या लोकांच्या कुंडलीच्या चौथ्या घरात असेल. या काळात तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यावेळी अपघात होण्याची शक्यता असल्याने तुम्ही नीट गाडी चालवली पाहिजे. कौटुंबिक तणावासोबतच आईची तब्येतही बिघडूण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीचा स्वामी सूर्य असून या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या १२ व्या घरात मंगळ असणार आहे. यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक खर्च वाढणार आहे. आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांच्या नवव्या घरात मंगळ ग्रह असणार आहे. मंगळाच्या या स्थितीने तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्येही अडथळे येऊ शकतात. लांबच्या प्रवासामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT