Moon sets on March 28 saam tv
राशिभविष्य

Chandra Ast 2025: 28 मार्च रोजी चंद्र जाणार अस्त अवस्थेत; 'या' 3 राशींच्या घरी पडणार पैशांचा पाऊस

Moon sets on March 28 lucky zodiac signs financial gain: मार्च ३०, २०२५ पर्यंत चंद्र मीन राशीत राहणार आहे. या काळात तो अस्त अवस्थेत असणार आहे. साधारणतः तीन दिवस चंद्र अस्त असेल, ज्याचा प्रभाव विविध राशींवर पडेल.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मन आणि मातेचा कारक मानलं जातं. चंद्र दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलतो. गोचर करण्यात चंद्राचा वेग सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगवान मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, 28 मार्च 2025 रोजी पहाटे 5 वाजून 27 मिनिटांनी चंद्र कुंभ राशीत अस्त होणार आहे. यानंतर चंद्र दुपारी 04 वाजून 47 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे.

चंद्र 30 मार्च 2025 पर्यंत मीन राशीत राहील. यासोबतच ते या काळात अस्त राहणार आहेत. चंद्र सुमारे तीन दिवस अस्त अवस्थेत राहणार असून चंद्राची स्थिती अनेक राशींसाठी उत्तम काळ घेऊन येणार आहे. यामुळे काही राशींना आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

चंद्र वृषभ राशीत श्रेष्ठ असून या कारणामुळे ज्यावेळी चंद्र मीन राशीत अस्त होणार आहे तेव्हा वृषभ राशीच्या लोकांना भरपूर लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य मिळणार आहे. अपूर्ण राहिलेली कामं या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीचा स्वामी स्वत: चंद्र आहे. चंद्राच्या अस्त स्थितीमुळे या राशींना मानसिक शांतीचा अभाव जाणवू शकतो. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. रखडलेले कामही या काळात पूर्ण होणार आहे.

धनु रास

चंद्राच्या दहनाचा मीन राशीच्या चौथ्या भावावर परिणाम होणार आहे. यामुळे कौटुंबिक आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या समस्यांमधून तुमची सुटका होऊ शकते. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. या गोष्टी केवळ माहितीसाठी दिल्या जात आहेत. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT