Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today: आज या राशींच्या पैशांच्या समस्या सुटतील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : काहींचा वैवाहिक जीवनात सौख्य आणि सुख दोन्हीही एकत्र मिळण्याचा आजचा दिवस आहे. जाणून घ्या तुमच्या राशीत आज घडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुरुवार,२८ नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष,प्रदोष.

तिथी- त्रयोदशी (अहोरात्र)

रास-तुला

नक्षत्र-चित्रा

योग- सौभाग्य

करण-गरज

दिनविशेष- त्रयोदशी वर्ज्य

मेष - वैवाहिक जीवनात सौख्य आणि सुख दोन्हीही एकत्र मिळण्याचा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. लांबच्या प्रवासाचे नियोजन होईल.

वृषभ - मन थोडे सैरभैर राहील. "एक ना धड भाराभर चिंध्या" अशी कामे होतील. कदाचित तब्येतीच्या तक्रारी सुद्धा वाढतील. बाहेरचे खाणे टाळावे.

मिथुन - लॉटरी सट्टा यामध्ये आज फायदा आहे. पैशाची गुंतवणूक सुद्धा फायदेशीर ठरेल. व्यवहार सचोटीने आणि योग्य होतील. दिवस चांगला आहे.

कर्क -आईची आज विशेष काळजी घ्यावी लागेल. तिच्याविषयी प्रेम दाटून येईल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. त्यांच्या सरबराई मध्ये दिवस व्यस्त राहील.

सिंह - गगनाला भिडेल एवढी कामे आज असतील. दिवस छोटा वाटेल. इतरांनी केलेल्या आपल्या स्तुतीमुळे मन फुलून जाईल. छोटे प्रवास घडतील.

कन्या - वाणीवर एक प्रकारची वेगळीच मिठास राहील. लोकांना आपलेसे करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेम पेरून आणि लोक हेरून कामे करा.

तूळ - आपली आभा उजळून निघणार आहे. आपले सुंदर व्यक्तिमत्व अजूनच फुलून येईल. मन सकारात्मक दिशेने धाव घेईल. स्वतःवर पैसा खर्च कराल.

वृश्चिक - "उगाचच इकडे आड तिकडे विहीर" असे होईल. नाहक कटकटी मागे लागतील. दुसऱ्याच्या सल्ल्याने वागावे लागेल जे आपल्याला मुळीच आवडत नाही. पण आज समजूतदारपणा वाढीस लागेल.

धनु - प्रेमामध्ये रंग फुलतील. पण आपल्या जोडीदाराचे ऐकावे लागेल. एकत्र भेटून गुजगोष्टी होतील. नात्याचा लाभ पदरात पडेल. दिवस चांगला आहे.

मकर- भाव आणि भावना यापेक्षा कर्माला प्राधान्य आपल्याकडून नेहमीच दिले जाते. आजही कर्म तुमच्या प्रगतीची साक्ष होतील. वाढीव कामे होतील. आणि तसाच मानही मिळेल.

कुंभ - प्रदोष आणि आपली रास याची सांगड छान आहे. शिव उपासना करा. आज फलदायी ठरेल. आज भावनेने नाही तर बुद्धीने काम करावे लागतील. भाग्याला कलाटणी मिळेल.

मीन - सहज असणाऱ्या गोष्टी अवघड होऊन बसतील. पण यातून तुम्हालाच मार्ग काढावा लागेल. नको त्या कटकटीत साध्या स्वभावामुळे अडकून राहाल. आणि बाहेर पडताना मृत्यूतुल्य यातना होतील.

ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT