मंगळ गोचर 2026: मे महिन्यात मेष राशीत प्रवेश; saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: मंगळ ग्रह राशी बदलताच येणार अच्छे दिन; ४ राशींचं नशीब पालटणार,घरी येणार पैसाच पैसा

Mangal Gochar 2026: मे महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आपली राशी बदलून स्वराशी मेष राशीत प्रवेश करेल. मंगळाचा हा बदल काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला याच राशींविषयी माहिती देणार आहोत.

Bharat Jadhav

  • 2 मे 2026 रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करणार

  • रुचक राजयोगामुळे काही राशींना मोठा लाभ

  • आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये सुधारणा

मंगळ ग्रह २ मे रोजी मीन राशीतून स्वतःच्या राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा जेव्हा मंगळ ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा पाच महापुरुष योगांपैकी एक असलेला रुचक योग तयार होत असतो. या राजयोगाच्या प्रभावामुळे काही राशींना मे महिन्यात लाभ होण्याची शक्यता आहे. या राशींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक सुबत्तेमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

मेष

मंगळ तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी खूप विशेष ठरणार आहे. मेष राशीत मंगळ आल्यानं या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना धन आणि समृद्धीचा अनुभव येऊ शकतो. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते.

मिथुन

मंगळ तुमच्या लाभ घरात भ्रमण करणार आहे. या गोचरमुळे तुमची थांबलेली कामे होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित परिणामही दिसू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल.

धनु

मंगळाचे हे गोचर या राशींच्या जातकांसाठी खूप खास असू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांना मे महिन्यात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्यात तुम्हाला चांगले आर्थिक परिणामही दिसू शकतात. तुमच्या पालकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमचा घरी चांगला वेळ जाईल. तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल झाल्याचे तुम्हाला जाणवू शकते.

कुंभ

मंगळाचे संक्रमण कुंभ राशीच्या जातकांसाठीही फलदायी आहे. त्यांच्या धैर्याला आणि शौर्याला चालना देऊ शकते. या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. ज्यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत आणि करिअरमध्ये प्रभावी परिणाम दिसून येतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कामासंबंधित प्रवास यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या लहान भावंडांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोककथांवर आधारित आहे. यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT