Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Venus Transit In Libra: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. सुख, वैभव, आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र जेव्हा आपल्या स्वराशीत किंवा उच्च राशीत प्रवेश करतो, तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह वैभव, संपन्नता आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. ठराविक कालांतराने शुक्र गोचर करतात आणि त्यातून राजयोगांची निर्मिती होत असते. ज्योतिषशास्त्रात पाच महापुरुष राजयोगांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी मालव्य राजयोग हा सर्वात प्रभावी योग मानला जातो.

नोव्हेंबर महिन्यात शुक्र स्वतःच्या स्वराशी तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या योगाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र काही राशींसाठी तो अतिशय शुभ ठरण्याची शक्यता आहे. या काळात काहींचं नशीब खुलून त्यांना धन, संपत्ती आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची संधी असणार आहे.

मकर राशी

मकर राशीसाठी मालव्य राजयोग अत्यंत अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या भावावर तयार होत असल्याने आर्थिक स्थिती सुधारणार आहे. धनप्राप्तीसाठी अनेक नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना संधी मिळणार आहे. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी मालव्य राजयोग भाग्य वृद्धिंगत करणारा ठरणार आहे. कारण शुक्र तुमच्या राशीपासून नवव्या भावावर भ्रमण करणार आहेत. या काळात तुमच्या आयुष्यात नशिबाचे दरवाजे खुलणार आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये सहभाग वाढणार आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे.

कन्या राशी

कन्या राशीसाठी मालव्य राजयोगाचे निर्माण धनप्राप्तीचे मार्ग खुलं करणार आहे. शुक्र तुमच्या राशीपासून धन आणि वाणी स्थानावर संचरण करणार आहेत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारणार आहेत. या काळात भाग्याची साथ मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्याही हा काळ लाभदायी राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO उतरणार मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT