Mahashtami 4 Rajyog saam tv
राशिभविष्य

Mahashtami 4 Rajyog: महाष्टमीला ५० वर्षानंतर बनणार खास योग; 'या' राशींना मिळेल भरपूर यश अन् बक्कळ पैसा

Mahashtami 4 Rajyog: नवरात्रोत्सवात उत्तमोत्तम शुभ योग जुळून येतायत. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, तब्बल ५० वर्षांनंतर हा योग जुळून येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या नवरात्र सुरु असून शनिवारी दसरा साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान दसऱ्यापूर्वी महाअष्टमी आणि महानवमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात उत्तमोत्तम शुभ योग जुळून येतायत. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, तब्बल ५० वर्षांनंतर हा योग जुळून येणार आहे.

नवरात्रीमध्ये बुध आणि शुक्राचे भ्रमण झालं आहे. या काळात तूळ राशीत या दोघांचा योग तयार झाला असून त्या योगाला लक्ष्मी नारायण योगाचीही जोड असणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवातील महाष्टमी उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदाची महाष्टमी अतिशय विशेष मानली जातेय. या दिवशी महानवमी सुरू होतोय. शिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि बुद्धादित्य राजयोग यांचा होणार आहेत, जाणून घेऊया यांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

मेष रास

या राशींच्या व्यक्तींसाठी महाष्टमी लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकणार आहे. नवे प्रकल्प तुमच्या हाती लागणार आहेत. कुटुंबामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होणार आहेत

कर्क रास

या राशींच्या लोकांसाठी महाष्टमी शुभ ठरणार आहे. बिझनेस करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं मनापासून कौतुक होणार आहे.

कन्या रास

या राशींच्या व्यक्तींना महाष्टमी शुभ परिणाम देणार आहेत. या काळात बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. बिझनेसमध्ये मोठी डील होऊ शकते. गुंतवणूकीच्या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT