March 2025 Triple Rajyog saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Yog: जुलैच्या अखेरीस बनणार महालक्ष्मी योग; 'या' राशींचं नशीब चमकणार, हाती पैसाही येणार

Mahalaxmi Yoga end July: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात, ज्यांचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. या शुभ योगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धन-समृद्धी देणारा योग म्हणजे 'महालक्ष्मी योग'.

Surabhi Jayashree Jagdish

जुलै महिन्याच्या अखेरीस सिंह राशीमध्य महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. मुळात चंद्र हा सर्वात वेगाने चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. त्यामळे त्याचा इतर ग्रहांशी संयोग होतो. तो शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण करत राहतो. त्याचप्रमाणे, हरियाली तीजच्या दिवशी चंद्र मंगळाशी संयोग करत आहे.

वैदिक पंचांगानुसार, चंद्र २६ जुलै रोजी दुपारी ३:५१ वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जिथे मंगळ आधीच उपस्थित आहे. मंगळ-चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. हा राजयोग २८ जुलै २०२५ पर्यंत राहील. सुमारे ५४ तासांसाठी तयार होणारा हा योग अनेक राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणारा महालक्ष्मी राजयोग लकी ठरू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. जर तुम्हाला एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकतं. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग अनेक क्षेत्रात लाभ आणू शकणार आहे. या राशीत केतू देखील आहे. महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती धन, कुटुंब आणि वाणीमध्ये शुभ परिणाम देणार आहे. तुम्हाला राजेशाही आनंद मिळू शकतो. परदेश प्रवासाच्या संधी देखील मिळू शकतात. या व्यवसायातही मोठे यश मिळू शकते.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर या काळात तो सोडवता येऊ शकतो. तुमच्या मानसिक स्थितीतही बरीच सुधारणा होऊ शकणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT