Mahabhagya Yoga astrology saam tv
राशिभविष्य

Mahabhagya Rajyog: 48 तासांनंतर बनणार आहे महाभाग्य योग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Mahabhagya Yoga astrology: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती आणि योग आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतो. लवकरच, एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग तयार होणार आहे, ज्याला 'महाभाग्य योग' असे म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार भूमिपुत्र मंगल सध्या कन्या राशीत आहे. याच काळात चंद्रमा देखील कन्या राशीत प्रवेश करणार आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी चंद्रमा कन्या राशीत येणार आहेत. आधीपासूनच त्याठिकाणी असलेल्या मंगळासोबत त्यांची युती होणार आहे. या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग, ज्याला महाभाग्य योग किंवा चंद्र–मंगल योग असंही म्हणतात. हा विशेष योग २७ ऑगस्टच्या संध्याकाळी ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत प्रभावी राहणार आहे.

मंगळ आणि चंद्राची युती झाल्यावर व्यक्तीच्या जीवनात भावनिक, आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीत मोठे बदल दिसून येऊ शकणार आहेत. या काळात नाती अधिक गोड होतात, आत्मविश्वास वाढतो आणि भाग्याची साथ लाभणार आहे. मात्र या योगाचा सर्वाधिक फायदा काही ठराविक राशींना होणार आहे.

मेष रास

मेष राशीसाठी हा महालक्ष्मी योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि आत्मविश्वास दुप्पट होणार आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि जोडीदारासोबत एखाद्या छोट्या सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. करिअरच्या दृष्टीने नवीन संधी तुमच्याकडे येणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग करिअर आणि प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल आहे. विशेषतः आयटी, डेटा सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सहकाऱ्यांशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात, पण शांतता आणि संयम राखून तुम्ही ते सहज सोडवू शकाल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी हा योग आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. भावना तसंच विचार स्पष्टपणे व्यक्त करता येतील. प्रेमसंबंधांत उत्साह आणि रोमांच वाढणार आहे. संयम आणि स्थिरता ठेवलीत तर तुमचे काम अधिक सोपे होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Accident : पनवेल रेल्वे स्टेशनवर बसचा ब्रेक फेल, चालकामुळे मोठी दुर्घटना टळली, थरराक व्हिडिओ

Teacher ID Scam: बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, ६८० शिक्षकांना अटक होणार?

Crime News : परदेशात नोकरीच्या खोट्या प्रलोभनाचा पर्दाफाश; मनसेच्या हस्तक्षेपाने दोन तरुणांची सुटका

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT