Love Rashi: Saam Tv
राशिभविष्य

Love Rashifal: 12 राशीतील 'या' ५ राशी असतात 'प्रेम दर्दी'; आयुष्यात कधीच मिळत नाही खरं प्रेम

Love Rashi: काही लोक प्रेमात नेहमी आनंदी असतात, तर काहींना विश्वासघात आणि संकटांना सामोरे जावे लागते. १२ राशीचक्रातील अशा ५ राशी आहेत ज्यांना प्रेमात यश मिळत नाही. त्यांची खरं प्रेम करण्याची इच्छा असते, पण त्यांना विश्वासघात मिळत असतो.

Bharat Jadhav

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला विशेष स्थान असते, पण काही लोक असे असतात ज्यांचे नशीब त्यांना प्रेमात फारसे साथ देत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचे जातक असे आहेत, ज्यांना प्रेमात नेहमी धोका मिळत असतो. हे लोक त्यांच्या नातेसंबंधात स्थिरता, समज आणि संतुलन शोधण्यात अक्षम ठरतात. कधीकधी त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात आणि कधीकधी त्यांचा स्वभाव किंवा परिस्थिती त्यांना प्रेमात आनंदी होऊ देत नाही. चला तर अशा ५ राशींबद्दल जाणून घेऊ ज्या प्रेमात यशस्वी होत नाहीत.

मिथुन

मिथुन राशीचे लोक खूप चंचल आणि परिवर्तनशील असतात. त्याचे मन खूप चांगले असते, पण त्याचा मूड कधीच सारखा नसतो. जेव्हा ते प्रेमात असतात तेव्हा ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात, परंतु त्यांचे मन लवकर बदलते. यामुळेच त्यांच्या नात्यात मतभेद वाढू शकतात. मिथुन राशीचे लोक त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकत नसल्यामुळे अनेकदा त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या भावना समजत नाहीत. ह्याच कारणामुळे त्यांचा विश्वासघात होऊ शकतो.

वृश्चिक

वृश्चिक लोक खूप खरे असतात आणि जेव्हा ते प्रेम करतात तेव्हा स्वतःला त्या प्रेमात वाहून टाकतात. ते त्यांच्या भावना लपवून ठेवतात आणि हे त्यांच्यासाठी अनेकदा ते अडचणीच ठरू शकते. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांचा जोडीदार त्यांच्यावर तितकेच प्रेम करेल. पण कधीकधी त्यांचा जोडीदार त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो किंवा विश्वासघात करत असतो.

मकर राशी

मकर राशीचे लोक त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात की ते प्रेमासाठी तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. ते स्वत:ला नोकरी आणि कामात पूर्णपणे हरवून बसतात. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत असतो. साथीदाराला वेळ देता येत नसल्याने त्यांना वाटतं की मकर राशीतील व्यक्ती त्यांना धोका देत आहे, असं वाटू लागतं. मकर राशीचे लोक सत्यवादी असतात, परंतु त्यांच्या जोडीदाराला त्यांची व्यस्तता आणि कामाचा ताण समजत नाही.

कन्या

कन्या राशीचे लोक खूप परफेक्ट असतात आणि त्यांना नेहमी सर्वकाही व्यवस्थित करायचे असते. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीत एक आदर्शपणा आणयचा असतो, विशेषत: प्रेमात. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडूनही खूप अपेक्षा असतात, ज्यामुळे कधी कधी नात्यात तणाव निर्माण होतो. कन्या राशीचे लोक त्यांच्या जोडीदारांवर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव टाकतात. जर त्यांच्या जोडीदाराने या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर ते रागावतात.

धनु

या राशीचे लोक खूप स्वतंत्र असतात आणि ते कोणावरही अवलंबून नसतात. ते नेहमी त्यांच्या निवडींना प्राधान्य देतात. त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे असते. प्रेमात असतानाही ते आपले स्वातंत्र्य सोडत नाहीत. कधी- कधी त्यांच्या या वागणुकीमुळे त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होत असते. त्यांच्या पार्टनरला समजत नाही त्यांना काहीवेळ एकटेपणा हवा असतो. जर जोडीदाराला हे समजले नाही तर नात्यात विश्वासघात होऊ शकतो, परंतु धनु राशीचे लोक ते लवकर विसरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT