Kark Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Kark Rashi Nature : खेकड्यासारखी प्रवृत्ती, इतरांना मागे खेचण्यात पटाईत; कर्क राशीचे लोक नेमके कसे असतात? वाचा...

Kark Rashi Personality : कर्क राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचा स्वभाव कसा असतो? त्यांच्यात काय गुण असतात जाणून घ्या सर्व काही

Anjali Potdar

कर्क या राशीचा स्वामी चंद्र. चर रास. जलतत्त्वाची रास. जिथे जलतत्त्व आहे तिथे भावना ओथंबून येतातच. खरंतर मोक्ष त्रिकोणापैकी एक रास. सुखाच्या संकल्पना आपल्या खूप साध्या सरळ असतात. सात्विक वृत्ती त्याच बरोबर खेकड्यासारखी प्रवृत्ती सुद्धा असते.

स्वतः खूप प्रगती करतीलच असं नाही, पण पुढे जाणाऱ्यांना खाली ओढण्यात माहीर असतात. येणाऱ्या पाहुण्यांचे आगत स्वागत छान करतात. यांची भावनांशी खूप जवळची कनेक्टिव्हिटी आहे. आईवर विशेष प्रेम. खरंतर कर्क आणि सिंह या राज राशी.

कर्क राशीला राणीचा दर्जा दिलेला आहे. मुळात ही रास खूप लाघवी डोळे मधाळ - पाणीदार, इमोशन्स भरपूर असतात. पण त्याच वेळी धैर्यशील सुद्धा हे लोक असतात.

माया प्रेम आणि आसक्ती या सर्व गोष्टी अधिक. स्त्री रास आहे. चंचलता, कोमलता, वेळेप्रमाणे बदल करण्याची प्रवृत्ती, परिस्थितीत चढ-उतार मिळू शकतात.

मंगळाची मात्र नीच रास. भावनेपुढे कर्तुत्वाला गौण महत्त्व दिले जाते. तलावाचे संबंधित रास असल्यामुळे पाण्यातून होणारे आजार या लोकांना होऊ शकतात. मद्यपान टाळावे. कर्क रास बिघडली असता कर्करोग होऊ शकतो.

हलके अन्न आणि आहार सात्विक आणि शुद्ध अन्न यांना आवडते. कायमस्वरूपी यांनी शिव उपासना करावी. जास्तीत जास्त जप करावा. दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे बेल व पांढरे फुल वहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT