Kanya Rashi Personality  Saam TV
राशिभविष्य

Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

Virgo Zodiac career : कन्या ही राशीचक्रातील सहावी रास. मुळात मूळ पुरुषाच्या कुंडलिक षष्ठ स्थानी येत असल्यामुळे रोग आजाराची आणि पोटाची द्योतक असणारी ही रास आहे.

Anjali Potdar

कन्या ही राशीचक्रातील सहावी रास. मुळात मूळ पुरुषाच्या कुंडलिक षष्ठ स्थानी येत असल्यामुळे रोग आजाराची आणि पोटाची द्योतक असणारी ही रास आहे. याची व्याप्ती 150 अंश ते 180 अंशापर्यंत आहे. उत्तरा नक्षत्राचे ३ चरण, हस्त ४ चरण, चित्रा दोन चरण अशा नऊ चरणांनी मिळून ही रास तयार झालेली आहे. कन्या राशीचे मुळातच जे चित्र आहे. त्या पद्धतीने पाहिले असता हे लोक असतात लाजाळू, नम्र आपल्या आपल्या कोशामध्ये राहणारी ही रास आहे.

बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुद्धिमान लोकांची रास आहे. विविध गोष्टी लिलया पेलवणारी ही रास आहे. द्विधामनस्थिती या गोष्टी यांच्यामध्ये असतात. यांच्यात खूप व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, व्यवहारकुशल, हिशोबीपणा, मोहक सौंदर्य, रेखीव आणि प्रमाणशीर अवयव रचना, चौकस असतात.

धनधान्याची आवड असते. इतरांना मार्गदर्शन करणे त्याचबरोबर दुसऱ्याला समजून घेणे. दुसऱ्याचे पोषण करण्याची ही वृत्ती असे चांगले गुण याच्यामध्ये येतात. काही वेळेला या राशीमध्ये थोडासा विनाकारण विचार करण्याचा स्वभाव आहे. ललित कलेची आवड आहे. सातत्याने प्रकाश झोतात राहणारे हे लोक आहेत. पैशाला महत्त्व देणारे कारण अर्थत्वाची रास आहे.

अति चिकित्सकपणा आणि टीका या दोन्ही गोष्टी या लोकांच्या आहेत. पण बुद्धिमान असणारे व्यवसाय जसे की सीए अकाउंट्स मध्ये किंवा कोणत्याही बौद्धिक क्षेत्रांमध्ये सहज धडक मारणारी अशी ही रास आहे. यांच्या वागण्या बोलण्यामध्ये द्विस्वभावपणा जाणवतो. पण तरीसुद्धा कोणाचेही वाईट करणारी किंवा विनाकारण स्पर्धा करणारी ही रास नाही.

मी आणि माझे बरे हे करत असणारी रास आहे. चांगले आणि वाईट या दोन्हीतला फरक यांना समजतो. तर मन शुद्ध असणारी मोठ्या, रजासमन लोकांशी खूप छान संबंध ठेवतात. लोकांशी समाजाशी कनेक्टिव्हिटी यांना आवडते. बोलण्याचाही स्वभाव असतो. पण खूप ओळख असेल तरच हे लोक त्यांच्यामध्ये मिसळतात.

अन्यथा आपण भले आणि आपले काम भले. सहसा कुणाच्या फंदामध्ये पडत नाहीत हे लोक हुशार असल्यामुळे टीकाकारही चांगले असू शकतात. अर्थात यांच्या बद्दल उगाचच गैरसमज सुद्धा निर्माण होतात. जसे की स्वतःला शहाणे समजतात किंवा टीकाकार आहेत. पण यामध्ये यांची बुद्धिमत्ता हा एक वेगळाच स्रोत जाणवून जातो. चेहरा बोलका असतो आणि नव तरुण वाटणारी ही रास आहे.

काही वेळेला समज उशिरा येते, चिरतरुण भासणारी ही रास आहे. पुस्तकांवर नितांत प्रेम असते. नपुंसक रास आहे. पण जुळ्यांची सुद्धा रास आहे यमल असे याला म्हणतात. धनधान्याची बरकत असते. एकूणच बुधाची रास असल्यामुळे भरभराट यांच्या राशीला आहे. कारण मुळामध्येच व्यवसाय - वैश्य प्रवृत्ती आपल्याकडे असल्यामुळे सर्व प्रकाराने पैसा मिळवण्याचे कसब आपल्याकडे असते.

थंड प्रवृत्ती आहे. आपल्या विचारांचा ठसा इतरांवर उमटवणारी अशी रास आहे. हसरा चेहरा, बोलके डोळे, कुरळे केस श्रीकृष्णाप्रमाणे मोहक असतात. रोग आजारांचा विचार केला तर पोटाशी निगडित आजार, मानसिक आजार, त्वचेचे विकार त्याचबरोबर त्रिदोष विकार अशी प्रकृती या लोकांची असू शकते. वातविकार त्रास देऊ शकतात.

त्यामुळे याची काळजी घ्यावी. विष्णू उपासना केल्यास यांना फायदा होऊ शकेल. यामध्ये व्यवसाय म्हणून विचार केला तर सीए, सीएस, अकाउंट मध्ये लोक पुढे जाऊ शकतात. अगदी क्लार्क असल्यापासून मोठ्या पदावर लोक कन्याराशीचे तुम्हाला दिसून येतात.

मुळामध्ये पुस्तक क्षेत्र, प्रिंटिंग, स्टेशनरी, लेखन यामध्ये हे लोक व्यवसायासाठी माहीर असतात. प्रकाशन संस्था असू शकतात. वर्तमानपत्र यामध्ये काम करणारे लोक असू शकतात. नवीन डिजिटल मीडियामध्ये क्षेत्रात तुम्हाला कन्या राशीचे लोक जास्तीत जास्त दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

SCROLL FOR NEXT