Guru Ast 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Ast: मिथुन राशीत अस्त होणार बृहस्पती; 'या' 3 राशींना मिळणार छप्परफाड पैसा, अडचणी होणार दूर

Guru Ast 2025: गुरु त्याच्या त्यांच्या चालीत बदल तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 12 जून रोजी गुरु मिथुन राशीत संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी अस्त होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामध्ये गुरु ग्रहाला देखील विशेष महत्त्व आहे. बृहस्पति हा देवांचा गुरू मानला जातो. ज्यावेळी गुरु त्याच्या त्यांच्या चालीत बदल तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 12 जून रोजी गुरु मिथुन राशीत संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी अस्त होणार आहे. गुरू अस्त होताच काही राशींच्या जीवनात चांगले दिवस सुरू होतील.

ज्यावेळी एखादा ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो. गुरु ग्रह एकूण २७ दिवस या राशीत अस्त राहणार आहेत. यानंतर तो बुधवारी सकाळी 9 जुलै 2025 रोजी पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनी मिथुन राशीत त्यांचा उदय होणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी गुरू लग्नभावात अस्त होणार आहे. या काळात तुमची जुनी रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. अचानक आर्थिक लाभ ही होऊ शकतो. काही अडथळ्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जे व्यवसाय करतात त्यांनी आपल्या जुन्या ग्राहकांकडून चांगला नफा मिळविणं अपेक्षित आहे.

सिंह रास

या राशीच्या नवव्या आणि पाचव्या भावाचा स्वामी गुरू आहे. मिथुन राशीत अस्त झाल्यावर अकराव्या भावात त्याचा प्रभाव पडणार आहे. मिथुन राशीत गुरू अस्त होत असल्याने परदेश प्रवासाची शक्यता राहणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधीही मिळणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.

तूळ रास

तुळ राशीच्या व्यक्तींसाठी गुरू तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे. गुरु या राशीच्या नवव्या भावात अस्त होणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत अनेक नवीन संधी मिळू शकतात. परदेशी संबंधित कामं यशस्वी होणार आहेत. प्रवासाचा फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT