Guru Gochar 2024 Saam Tv
राशिभविष्य

Guru Nakshatra Gochar: २८ नोव्हेंबर रोजी गुरु बदलणार नक्षत्र; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Guru Nakshatra Gochar 2024: गुरु ग्रह एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतो. देवांचा गुरू गुरू 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:10 वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामध्ये बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाला देखील विशेष स्थान देण्यात आलंय. बृहस्पतिच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. गुरु ग्रह एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतो.

येत्या काळात गुरु ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बृहस्पति चंद्राच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकणार आहे. देवांचा गुरू 28 नोव्हेंबरला दुपारी 1:10 वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी गुरु आणि 2025 मध्ये 10 एप्रिलपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. जाणून घेऊया गुरुचं नक्षत्र गोचर कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

सिंह रास

बृहस्पति रोहिणी नक्षत्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगला नफा मिळणार आहे. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना यावेळी मोठा नफा मिळू शकतो.

कर्क रास

या राशीमध्ये गुरु नवव्या घराचा स्वामी आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर खुश असणार आहेत.

धनु रास

रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर गुरु या राशीच्या सहाव्या भावात असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार असून फीटनेसबाबत तुम्ही काटेकोर राहाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

SCROLL FOR NEXT