Surya-Guru Yuti saam tv
राशिभविष्य

Surya-Guru Yuti: 12 वर्षांनंतर होणार गुरु-सूर्याची युती; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Sun And Jupiter Conjunction In Mithun: ग्रहांच्या गोचरमुळे एका राशीत दोन ग्रहांची युती निर्माण होते. येत्या काळात ग्रहांचा राजा आणि गुरु यांची युती आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य देवाला सन्मान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास, नोकरी यांचा कारक मानण्यात आलं आहे. तर गुरु गुरुला ज्ञान, समृद्धी, पैसा आणि आनंद यांचा कारक मानण्यात आलंय. येत्या काळात ग्रहांचा राजा आणि गुरु यांची युती आहे.

जूनमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि गुरु यांच्यात युती होणार आहे. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण यावेळी ३ राशी आहेत ज्यांना या युतीचा फायदा होणार आहे. यावेळी काही राशींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तर काहींना चांगला पैसा मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशी आहेत ते पाहूयात.

वृषभ रास

सूर्य आणि गुरु ग्रहाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. मानसिक शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. व्यावसायिकांना पैसे मिळू शकतात.

कन्या रास

सूर्य आणि गुरु ग्रहाची युती करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. कारण हा योगायोग तुमच्या राशीच्या कर्मभावावर तयार होणार आहे. या वेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकतं. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना यश मिळेल. करियरमध्ये चांगली संधी मिळू शकते.

मीन रास

गुरु आणि सूर्य यांचं संयोजन तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कारण हा योगायोग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात घडणार आहे. तुम्हाला काही वाहनं आणि मालमत्ता मिळू शकणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

SCROLL FOR NEXT