Guru Budh Yuti saam tv
राशिभविष्य

Guru Budh Yuti: मिथुन राशीमध्ये १२ वर्षांनी होणार गुरु-बुधाची युती; 'या' राशींची करियरमध्ये होणार प्रगती, मिळणार अपार संपत्ती

Guru Budh Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह साधारणतः प्रत्येक पंधरा दिवसांनी आपली रास बदलतो, तर गुरू ग्रह वर्षातून एकदाच राशी परिवर्तन करतो. यंदा १४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, आणि जून महिन्यात बुध ग्रहही याच राशीत दाखल होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आणि गुरु ग्रहांना खूप महत्व देण्यात येतं. हे दोन्ही ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. गुरु ग्रहाला देवांचा गुरु मानण्यात येतं. चक बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानण्यात येतं. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह सुमारे १५ दिवसांत त्याच्या राशीमध्ये बदल करतो. तर गुरु एका वर्षात असं करतो. १४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. जून महिन्यात बुध ग्रह देखील या राशीत येणार आहे. मिथुन राशीत बुध आणि गुरूची युती होणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध ग्रहाची युती फायदेशीर ठरू शकणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांचा अंत होऊ शकणार आहे. मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना फायदा मिळू शकणार आहे. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा कल अध्यात्माकडे असणार आहे.

सिंह रास

या राशीच्या पहिल्या घरात बुध आणि शुक्र यांची युती होणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला भरपूर नफा मिळण्याची शक्यता असते. करिअर क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकणार आहेत. तुम्ही बनवलेल्या रणनीतीद्वारे व्यवसाय क्षेत्रात मोठा नफा कमवू शकता.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध-गुरूची युती नवव्या घरात असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या संघर्षांपासून आता तुम्हाला आराम मिळू शकणार आहे. समाजात आदर आणि सन्मान झपाट्याने वाढू शकतो. उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT