Janmashtami 2024 Horoscope 
राशिभविष्य

Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीला ३ दुर्मिळ योग, कोणत्या राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण जगभरात साजरा होताना दिसतोय. यंदाची जन्माष्टमी अतिशय विशेष आहे, याचं कारण म्हणजे ज्योतिष्य शास्त्रानुसार, आजच्या दिवशी ५२५१ वर्षांपूर्वी म्हणजेच द्वापर युगात जो दुर्मिळ योग तयार झाला होता, तोच योग तयार होतोय. आजच्या दिवशी सूर्य रोहिणी नक्षत्रासोबत सिंह राशीत, चंद्र वृषभ राशीत याशिवाय जयंती योग तयार झाला आहे. अशा दुर्मिळ संयोगाची निर्मिती अत्यंत शुभ मानली जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार आज शुक्रादित्य, शश राजयोग आणि त्यासोबत वृषभ राशीमध्ये गुरू आणि चंद्राचा संयोग होत असल्याने गजकेसरी योग नावाचा राजयोग तयार झाला आहे. अशा परिस्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होणार आहेत. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना यावेळी अधिक लाभ मिळू शकणार आहे.

मेष रास (Mesh Zodiac)

या राशीच्या व्यक्तींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. तसंच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रलंबित कामे पूर्ण होणार असून संपत्तीतही वाढ होणार आहे. वडिलांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा जन्माष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांना गुरु, शुक्र तसंच इतर ग्रहांची शुभ दृष्टी असणार आहे. या राशीचे लोक आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर अनेक क्षेत्रात यश संपादन करू शकतात. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग फायदेशीर ठरू शकणार आहे. धार्मिक बाबींमध्ये वाढ होऊ शकणार आहे. नवीन घर, वाहन किंवा कोणतीही मोठी मालमत्ता घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. नशिबाने साथ दिल्याने अनेक गोष्टी साध्य होतील.रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT