Grahan yog saam tv
राशिभविष्य

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Surya And Rahu Yuti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ च्या सुरुवातीला सूर्य आणि राहू युती होणार आहे. ही युती अशुभ मानली जाते आणि काही राशींसाठी ती धोकादायक ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

साल 2026 मध्ये अनेक ग्रहांच्या संयोगामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये राहू आणि सूर्यदेवांचा अशुभ ग्रहण योगही समाविष्ट आहे. 2026 च्या सुरुवातीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे ज्याठिकाणी राहू ग्रह आधीच उपस्थित आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, यावेळी सूर्य आणि राहूची युती होऊन अशुभ ग्रहण योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या अडचणी वाढू शकणार आहेत. तसंच काही राशींच्या आरोग्याचंही नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

मीन राशी (Pisces)

सूर्य आणि राहूची युती मीन राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अनावश्यक खर्चांचा सामना करावा लागू शकतो. खोटे आरोपही तुमच्यावर येऊ शकतात. व्यापाऱ्यांनी या काळात कोणतीही मोठी डील करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते.

कर्क राशी (Cancer)

राहू आणि सूर्याची युती कर्क राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकणार आहे. हा दोष तुमच्या राशीपासून अष्टम भावात तयार होणार आहे. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. हृदयविकाराच्या रुग्णांनी विशेष सावधगिरी बाळगावी. या काळात जीवनसाथीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूची युती प्रतिकूल ठरू शकणार आहे. हा दोष तुमच्या राशीपासून सहाव्या भावात तयार होणार आहे. छातीचे आजार त्रासदायक ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी वाद होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT