September Grah Gochar saam tv
राशिभविष्य

September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्यासह ४ ग्रहांच्या चालीत होणार बदल; 'या' राशींना मिळणार नव्या नोकरीच्या संधी

September 2025 Grah Gochar: या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ४ प्रमुख ग्रहांच्या राशी बदलणार आहेत. या बदलांमुळे काही राशींच्या लोकांना करिअरमध्ये आणि नोकरीच्या क्षेत्रात प्रचंड फायदा होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार सप्टेंबर महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे चारही महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. याचा परिणाम थेट मानव जीवनावर, करिअरवर तसेच व्यापार-व्यवसायावर दिसून येणार आहे.

यामध्ये १३ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. १५ सप्टेंबरला शुक्र सिंह राशीत तर बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर १७ सप्टेंबरला सूर्यही कन्या राशीत प्रवेश करणार असून बुधाबरोबर बुधादित्य योग निर्माण होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या नशिबात करिअर, नोकरी, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात मोठे बदल होणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप शुभ ठरू शकणार आहे. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध सुधारणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ आणि भीती कमी होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध सुधारणार आहेत. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतील.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठीही हा ग्रहसंचार फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायिकांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. नोकरी-करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखकर राहणार आहे.

सिंह राशी

सिंह राशीसाठी सप्टेंबर महिना विशेष लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सुख-शांती नांदणार आहे. नशिबाची साथ लाभणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. व्यवसायिकांना नफा मिळेल, तसंच गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

SCROLL FOR NEXT