Shukra Gochar saam Tv
राशिभविष्य

Shukra Gochar: एप्रिल महिन्यात 3 राशींवर शुक्र पाडणार पैशांचा पाऊस; उत्पन्नात होणार प्रचंड वाढ

Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आपल्या निश्चित कालानंतर राशी परिवर्तन करतात. लवकरच शुक्र ग्रह देखील आपल्या नवीन राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह भौतिक संपत्ती, प्रसिद्धी, कला, सौंदर्य आणि आकर्षण यासोबतच विलासी जीवनशैलीसाठीही ओळखला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. येत्या काळात असंच शुक्र ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे. भौतिक सुख, कीर्ती, कला डिझायनिंग आणि वासना इत्यादी देणारा शुक्र ग्रह ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे.

ठराविक काळानंतर जेव्हा शुक्राची हालचाल बदलते, तेव्हा त्याचा प्रथम व्यक्तीच्या या पैलूंवर परिणाम होतो. वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, 26 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजून 2 मिनिटांनी शुक्र उत्तरभद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 16 मे 2025 पर्यंत उपस्थित राहणार आहे. शुक्राच्या या गोचरचा एप्रिल महिन्यात कोणत्या तीन राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे ते जाणून घेऊया.

मेष रास

शुक्राच्या विशेष कृपेने मेष राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात फायदा होण्याची शक्यता आहे. मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. वृद्ध व्यक्तींना कोणत्याही जुनाट आजाराच्या वेदनेपासून मुक्ती मिळू शकते. घरात आनंद राहणार आहे.

कर्क रास

एप्रिल व्यतिरिक्त मार्च महिना कर्क राशीच्या लोकांच्या हिताचा राहणार आहे. जे लोक कोणत्याही जुनाट आजाराने त्रस्त आहेत, त्यांचे आरोग्य सुधारणार आहे. घरामध्ये एखादं मंगलकार्य होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं सहकार्य मिळणार आहे. अचानक तुम्हाला पैसा मिळणार आहे.

वृश्चिक रास

शुक्राच्या विशेष कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांच्या शारीरिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया, हेल्थ क्षेत्रात गुंतलेले लोक लवकरच चांगलं यश प्राप्त करणार आहेत. दुकानदार आणि व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या काळात तुम्ही कर्जाचे पैसे सहज फेडू शकतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

SCROLL FOR NEXT