आजचे राशी भविष्य
Horoscope Today 2nd July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा जाईल; वाचा आजचं संपूर्ण राशी भविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचांग - दिनांक २ जुलै २०२४

वार - मंगळवार ज्येष्ठ कृष्णपक्ष. तिथी - योगिनी भागवत एकादशी.

नक्षत्र - कृत्तिका. योग - धृति. करण - बालव. रास - वृषभ. व्दादशीश्राद्ध दिनविशेष -वर्ज्यदिवस

मेष : मनस्वास्थ्य नीट ठेवावे

आजचा दिवस थोडा अस्वस्थता घेऊन आलेला आहे. विनाकारण न केलेल्या गोष्टीचा ससेमीरा मागे लागेल. परदेश गमनाचे प्रवास आखाल. मनस्वास्थ्य नीट ठेवावे.

वृषभ : व्यक्तिमत्व उजळेल

दिवस खूप छान जाणार आहे. आपल्यासाठी शुक्राच्या सर्व गोष्टी सहजगत्या मिळणार आहेत. स्वतःचे अस्तित्व स्ट्रॉंग करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कराल. सकारात्मक राहावे. व्यक्तिमत्व उजळेल.

मिथुन : दिवस मजेत घालवाल

खाण्यापिण्याच्या आवडी आज विशेष जाग्या होतील. रसना काय असते हे कळेल. कुटुंबीयांशी मजेत दिवस घालवाल. संधी मिळाल्यास योग्य ठिकाणी पैसे खर्च कराल.

कर्क : स्वतःचा आत्मविश्वास वाढेल

भावंडांचे विशेष सौख्य लाभेल. जवळचे प्रवास घडतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. पराक्रमाने पाऊलवाट घट्ट कराल. दिवस छान जाईल.

सिंह : साक्षीदार राहू नका

घराचे किंवा इतर व्यवहार मार्गी लागतील. पशुधनापासून विशेष मिळकत हाती येईल. आज मात्र कोणाच्याही व्यवसायिक गोष्टीत साक्षीदार राहू नका.

कन्या : द्विधा मनस्थिती टाळा

संतती खूप छान बातम्या आज तुमच्यासाठी घेऊन येईल. आपल्याला त्याचा अभिमान वाटेल. विशेष विष्णू उपासना आज फलदायी होईल. द्विधा मनस्थिती टाळा.

तूळ : विनाकारण त्रास होईल

हाताखालच्या लोकांना थोडे समजून घ्यावे लागेल. काही गोष्टी न करता सुद्धा विनाकारण त्रास होईल. नोकरी निमित्ताने प्रवास होईल. त्यात अडचणी येतील.

वृश्चिक : मौनाला जवळ कराल

"तुझं माझं जमेना तुझ्या विना करमेना" असा आजचा दिवस आहे. जोडीदाराबरोबर पटत नाही पण त्याच्याशिवाय दिवसही जात नाही अशा संदिग्ध अवस्थेत रहाल. मौनाला जवळ कराल असे वाटते आहे.

धनु : अशा गोष्टी टाळा

काळा पैसा आणि त्याच्या ओघात काही गोष्टी करायला जाल आणि आपलेच हात दगडाखाली अडकवून घ्याल .आणि म्हणून अशा गोष्टी टाळा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपा.

मकर : भाग्याची साथ मिळणार

कष्ट केले तर त्याचे फळही मिळतेच. भाग्याची साथ ही आज आपल्याला उत्तम मिळणार आहे. अर्थात आलेल्या पैशात दानधर्म, तीर्थयात्रा कराल. त्याचा पुढील कर्माची पुंजी तगडी करण्यासाठी उपयोग होईल.

कुंभ : नवीन पद मिळण्याची शक्यता

नोकरी व्यवसायामध्ये नवीन पद मिळण्याची दाट शक्यता आहे. संशोधनात्मक विषयांमध्ये प्रगती होईल. सहकाऱ्यांशी सौहार्दाने वागाल.

मीन : दिवस सुंदर पर्वणीचा

प्रेमाने जग जिंकता येते असं म्हणतात. त्यात तुम्ही कराल नातेवाईक, मित्र, कुटुंबीय सगळ्यांशी आज नाते चांगले राहील. मनापासून अनेक गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी कराल तेही करतील. दिवस हा सुंदर पर्वणी घेऊन येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकूीचा प्रचार केल्याचा शिंदेंचा आरोप

PHOTO: महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!

IND vs ZIM Live Score, 1st T20I: झिम्बाब्वेसमोर भारताची 'युवा सेना' ढेर; Team India ला दिसऱ्यांदा दिली मात

Pandharpur Wari: राहुल गांधींना उशिरा सुचलेलं शहाणपण, आषाढी वारीवरून चंद्रकांत पाटील यांचा टोला

Ashadhi Wari 2024: पवार कुटुंबीय राजकारणात विभक्त वारीत एकत्र!

SCROLL FOR NEXT